शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कसं जगायचं आयुष्य? त्यासाठीचं काही सूत्र आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 17:05 IST

प्रत्येक क्षणाची अनुभुती आणि तरुण विचार ठेवतील तुम्हाला आनंदी, उत्साही..

ठळक मुद्देतुमचं वय काहीही असू द्या, पण तुमचे विचार तरुण असले पाहिजेत.तारुण्याचा अनुभव तुम्ही घेत असला पाहिजेत आणि जणू उद्याचा दिवस, उद्याचा क्षण पुन्हा येणारच नाही, या पद्धतीनं प्रत्येक क्षणाची अनुभुती घेतली पाहिजे.अर्थातच तो क्षण आनंदाचाच असेल असं नाही, पण त्या क्षणात तुम्हाला जगता आलं पाहिजे.

- मयूर पठाडेआयुष्य कसं जगायचं? मोठा अवघड प्रश्न आहे, पण प्रत्येकानं त्यासाठीच आपापलं उत्तर शोधलेलं असतं आणि त्यापद्धतीनं ते जगत असतात.पण खरं तर आयुष्य जगण्याचं एकच सूत्र आहे आणि ते लहानापासून मोठ्यांपर्यंत साºयांना लागू आहे.काय आहे हे सूत्र?तुमचं वय काहीही असू द्या, पण तुमचे विचार तरुण असले पाहिजेत, तारुण्याचा अनुभव तुम्ही घेत असला पाहिजेत आणि जणू उद्याचा दिवस, उद्याचा क्षण पुन्हा येणारच नाही, या पद्धतीनं प्रत्येक क्षणाची अनुभुती घेतली पाहिजे. अर्थातच तो क्षण आनंदाचाच असेल असं नाही, पण त्या क्षणात तुम्हाला जगता आलं पाहिजे.बस्स, एवढंच आहे जगण्याचं सूत्र..या सूत्राच्या जोडीला आणखी एक कृती मात्र पाहिजे.शरीर आणि मन आनंदी, तरुण ठेवायचं तर तुमच्या शरीरालाही तशी सवय लावली पाहिजे. त्यासाठी काही जण व्यायाम करतात, कोणी कुठल्या तरी छंदाला वाहून घेतात.अर्थातच त्यासाठी व्यायामाला पर्याय नाही, पण काही जणांना वाटतं, आपलं शरीर जणू काही तासलेलं असावं, इतकं परफेक्ट असावं. सिक्स पॅक्स असावेत. शरीरावर थोडीही चरबी दिसायला नको. त्यासाठी ते जिवाचं रान करतात, पण संशोधकांचं आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे, त्यासाठी इतका अतिरेक करायची आणि शरीराला नको इतकं छळण्याचीही काहीच गरज नाही. तुमच्या वयाला झेपेल असा खेळ मात्र प्रत्येकानं अवश्य खेळला पाहिजे. तो तुम्हाला नुसतं तंदुरुस्तच राखणार नाही, तर तुम्हाला तारुण्यही बहाल करील. तुम्ही ज्या वयाचे आहेत, त्यापेक्षा तो तुम्हाला नक्कीच तरुण बनवील.व्हायचंय तुम्हालाही तरुण?.. मग चला खेळायला..