शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

काळी आई कशी देऊ जी...

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

काळी आई कशी देऊ जी...

काळी आई कशी देऊ जी...
-दोन एकर शेतीसाठी आनंदाचा सघर्ष
(फोटो रॅपमध्ये आहे)
नागपूर : काळी आईला कसली म्हणून ती आज पावली, पन अधिकारी शेत सोडण्यासाठी दबाव आणत्यात. दोन एकरचा हा पट्टा सोडून काय करू, लेकरानले काय खावू घालू, की कुटुंबासोबत म्या बी आत्महत्या करू, अशी कैफियत आनंदा ताजने या शेतकऱ्याने मांडली.
भूमिहीनांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेने आज गुरुवारी विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चात आनंदाही सहभागी झाला होता. वाशीम जिल्हातील आमखेडा येथून तो आला होता. हातात पिवळा झेंडा उंच धरीत तोही पोटतिडकीने नारे देत होता. मायबाप सरकार आपलं मागणं मान्य करून आपली जमीन आपल्या ताब्यत देईल, एवढीच त्याची अपेक्षा होती.
आनंदाला बोलत केले असता तो म्हणाला, १९८५ पासून हा दोन एकरचा पट्टा वाहतो. त्यावेळी शेतीत दगड-धोंडे होते. काटेरी झुडूप होते. राबराब राबलो तेव्हा कुठं शेत उभं झालं. आता कुठे हातात पीक येऊ लागलं. पण अधिकारी ही जमीन गायरान असल्याचे सांगून घाबरवतात. पिकवू नको म्हणून दटावतात. काही पोट्टे जाणूनबुजून शेतात शिरतात, भरलं पीक नासवतात. जमीन आपल्या नावान नसल्याने तक्रार तरी कुठं करावी. दुष्काळ, गारपिटीचा एक पैसा मिळत नाही. शेती बुडली म्हणजे ते वर्ष आमच्यासाठी लई कठीण जाते....काय करू जी...दोन पोर आहेत. त्यानले शिकवून मोठं करायच सपन आहे. ते सपनही हे लेकाचे पाहू देत नाही. दोन एकरच्या शेतीत दोन वेळची भाकर मिळत नाही जी. दुसऱ्यांच्या शेतात राबतो, मजुरी करतो म्हणून जमते. पण कुटुंबाला आधार त्या दोन एकर काळ्या आईचाच. शासनाने ही जमीन ताब्यात दिलं तर जमते जी...असे म्हणत रडायला आलेला आनंदाने तोंड फिरवले... हातातील पिवळा झेंडा आणखी उंच धरला...