शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

कसं लक्षात येईल, पण तुम्ही नक्कीच तणावात आहात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 16:02 IST

धावायचं सगळ्यांनाच आहे, पण ही लक्षणं दिसत असतील तर थांबा थोडं..

ठळक मुद्देज्यांना सततचा तणाव असतो, त्यांना डोकेदुखीची समस्या हमखास जडते. अनेकदा विकेण्डला ती नक्की डोकं वर काढते. या काळात डोकं जास्त दुखतं.महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान जास्त त्रास होणं, क्रॅम्प्स येणं या समस्या शारीरिक नव्हे, तर मानसिक ताणामुळे आलेल्या असू शकतात. काही जणांचा जबडा दुखतो. काही जणांची दातखीळ बसते. त्याचंही कारण थंडी नव्हे, तर चिंता हेच असू शकतं.

- मयूर पठाडेएकामागे एक कामांचा रगाडाच आजकाल इतका असतो.. एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं कि तिसरं.. ना कामांची यादी संपत, ना काम.. एकट्या माणसानं पळायचं तरी किती आणि कसं? त्याचीही क्षमता कधीतरी संपतेच.. पण तरीही पळत राहाणं त्याच्या नशिबातून काही सुटत नाही.. आता तर ही धावाधाव, पळापळ इतकी वाढली आहे की, या पळापळीमुळे आणि रोजच्या कामाच्या टेन्शनमुळे आपल्या शरीरावर काही परिणाम होतोय, याकडे पाहायलाही आपल्याला वेळ नसतो. या टेन्शनची लक्षणंही आपल्याला दिसेनाशी होतात. कारण आपल्या मागे लागलेला असतो वाघ आणि हा वाघ आपल्या पाठी लागलेला असल्यावर इतर गोष्टींकडे आपलं लक्ष जाणार तरी कसं?पण शास्त्रज्ञांनी याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. आपण जर टेन्शनमध्ये असू, तर त्याची लक्षणं आपल्याला दिसतातच. त्याकडे आपण लक्ष ठेवायला हवं आणि त्यापासून वेळीच योग्य ती काळजीही घेतली पाहिजे.. ही लक्षणं खरं तर आपल्याशी बोलत असतात, आता थांबा थोडं, लक्ष द्या इकडे.. नाहीतर तुम्ही गोत्यात याल..टेन्शनची कोणती लक्षणं आपल्याला दिसतात?१- ज्यांना सततचा तणाव असतो, त्यांना डोकेदुखीची समस्या हमखास जडते. अनेकदा ही डोकेदुखीही विचित्र असते, सुटीच्या दिवशी, विकेण्डला ती नक्की डोकं वर काढते. या काळात डोकं जास्त दुखतं.२- सतत धावाधाव आणि शंभर गोष्टी उरकण्याच्या मागे असलेल्या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान जास्त त्रास होणं, क्रॅम्प्स येणं या समस्या इतर महिलांच्या तुलनेत नेहमीच जास्त प्रमाणात जाणवतात. शारीरिक नव्हे, तर मानसिक ताणामुळे आलेलं हे दुखणं आहे, हे आपण वेळीच समजून घेतलं पाहिजे.३- अनेकदा काही जणांचा जबडा दुखतो. दातदुखी वगैरे कारणापेक्षाही टेन्शनमुळे आलेलं हे दुखणं असू शकतं. त्याचबरोबर काही जणांची दातखीळ बसते किंवा दातांना हुडहुडी भरून ते वाजायला लागतात, त्याचंही कारण थंडी नव्हे, तर चिंता हेच असू शकतं.४- आपल्या आयुष्यात स्वप्नांना खूप महत्त्व आहे. भविष्यात काही करायचं तर स्वप्न पाहावीत असंही म्हटलं जातं. त्यासाठी डॉ. कलामांचाही दाखला दिला जातो. ही स्वप्नं जर सकारात्मक असली तर दुसºया दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला खरोखरच फ्रेश वाटतं, पण तुम्हाला जर चित्रविचित्र स्वप्नं पडत असतील किंवा रात्री मध्येच केव्हाही अचानक जाग येत असेल, रात्री एकापेक्षा जास्त वेळा तुम्ही उठत असाल, तर लक्षात घ्या, ही स्वप्नं त्रासदायक आहेत आणि तुमचं टेन्शन तुम्हाला झोपू देत नाहीए.शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, ही लक्षणं जर तुमच्यात दिसत असतील, तर त्यापासून वेळीच सावध व्हा. आपला वेग थोडा कमी करा. थोडे शांत व्हा. धावायचं तर सगळ्यांनाच आहे, पण थकलेले असताना, जर तुम्ही धावलात, तर फार पुढे तर तुम्ही जाणार नाहीतच, पण फार काही तुम्हाला करताही येणार नाही.