शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आपला इण्टरव्ह्यू फसला, नोकरी गेली हातची हे कसं ओळखाल?

By admin | Updated: May 31, 2017 16:23 IST

आपली पात्रता असते तरी नोकरी मिळत नाही, इण्टरव्ह्यू फसतो तेव्हा नक्की काय घडतं?

- पवित्रा कस्तुरेनोकरीच्या इण्ट्यरव्ह्यूला जाताना छातीत धडधडतंच. आपल्याकडे डिग््रया असतात, नॉलेज असतं, आपण पात्रही असतो, अनुभवही असतो. पण तरी आपल्याला हवी ती किंवा मिळेलच अशी खात्री असलेली चांगली नोकरी अनेकदा मिळत नाही. आपल्याला वाटतं की, आपला इण्टरह्यू तर चांगला झाला, खूप इम्प्रेस झाले मुलाखत घेणारे, पण मग तरी आपल्याला ती नोकरी का मिळाली नाही? असं अनेकदा झालं, वारंवार झालं की आपण निराश व्हायला लागतो. कळत नाही चुकतं काय? कुणाचं? आणि कशानं? पण त्यावरही उपाय आहे, आपली मुलाखत नक्की कशी झाली, हे आपलं आपणच समजून घ्यायचं. म्हणजे मग पुढच्या कॉलची वाट पाहत न बसता, पुढच्या मुलाखतीच्या उत्तम तयारीला आपण मोकळे.कसं ओळखा नोकरी गेली हातची की नाही ते?दोन मिण्टात बाहेर?तुम्ही आत जाता, मुलाखत घेणारा एखादाच प्रश्न विचारतो. तुम्ही उत्तरही तुमच्यामते अचूक देता. पण मग तो म्हणतो या आता. आम्ही कळवतो. तिथंच ओळखायचं की आपली शितावरुन भाताची परीक्षा झाली आहे, त्यांच्यालेखी आपण योग्य उमेदवार नाही. मुलाखत फारच कमीवेळ झाली की आपली विकेट गेली हे समजून घ्यायचं.तुमचं शिक्षण खूप जास्त आहे..असं आपली कागदपत्रं पाहून जर मुलाखत घेणारा म्हणाला तर समजा की, आपली दांडी गूल. काहीतरी कारण सांगायचं म्हणून तसं सांगतात किंवा खरंच एवढं जास्त शिक्षण असलेला उमेदवार त्यांना नको असतो त्या पदासाठी. मात्र काहीही झालं तरी अर्थ तोच, नकार.

तुम्ही अमूकतमूक का करत नाहीसमजा, प्रश्न विचारण्यापेक्षा मुलाखत घेणारा तुम्हाला सल्ले देवू लागला, हे करा-ते करा, अमूक का करत नाही तर समाजयचं की आपल्याला जा असं सांगता येत नाही म्हणून हे सारं चाललं आहे.तुम्ही फार टॅलेण्टेड आहातअसं कधी कधी मुलाखत घेणारे सांगतात, आपल्याला बरं वाटतं. पण तसं नसतं. त्यांना खरंतर सांगायचं असतं की तुम्ही ओव्हरस्मार्ट आहात, ही चालाखी इथं नाही चालायची. या आपण.मुलाखतीला उशीरम्हणजे अनेकदा होतं काय पहिल्या राऊण्डला सिलेक्शन होतं. पण पुढचा कॉलच येत नाही. मेलला उत्तर येत नाही. समजा आलाच एखादा कॉल तर रिसेप्शनवर बसवून ठेवतात. मुलाखतीला उशीर करतात. आणि मग थातूरमातूर कारण सांगून नकार देतात. असं का करतात? ते चूक की बरोबर हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा. मात्र त्यातून आपल्याला मेसेज एकच, नोकरी नाही.