शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

श्वासाचं बोट धरून वर्तमानात या, तुमचं जगणं तो समृद्ध करील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:14 IST

भूतकाळ आणि भविष्यकाळातील आभासी जगण्यानं आयुष्याचा होतो कोंडमारा

ठळक मुद्देश्वासाबरोबर जगायला शिका.श्वासाचा उबदार अनुभव हरघडी घ्या..नक्की दिसतील सकारात्मक परिणाम.

- मयूर पठाडेअनेक जण असतात, ज्यांना एकतर भूतकाळानं पछाडलेलं असतं किंवा भविष्यकाळानं चिंतीत केलेलं असतं. वर्तमानकाळ जणू त्यांच्यासाठी नसतोच. एकतर ते भूतकाळात जगतात नाहीतर भविष्यकाळात..अर्थातच अशा लोकांच्या आयुष्यात त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. कारण ‘वास्तवाशी’ संबंध नसलेल्या या गोष्टींचा त्यांना नुसता मनस्तापच होत नाही, तर वास्तविक काही करण्यातही अशा व्यक्ती बºयाचदा अपयशी ठरतात.आयुष्याचा सामना करायचा, ते जसं आहे तसं स्वीकारत पुढे जायचं, आपली प्रगती साधायची तर त्यासाठी वर्तमानाचा हात धरण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण वर्तमानात ज्या काही गोष्टी तुम्ही करतात, त्या आणि त्याच गोष्टींचा प्रभाव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर पडत असतो. तुम्ही कोण आहात किंवा भावी आयुष्यात तुम्ही कोण असणार आहात, हे तुमच्या वर्तमानावरच ठरत असतं. त्यामुळे भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमण्यापेक्षा वर्तमानात जगणं केव्हाही महत्त्वाचं.पण वर्तमानात राहायचं तरी कसं?आपल्या मनाला आवरायचं तरी कसं?आता आपण वर्तमानातच जगायचं, असं नुसतं म्हणून तसं जगता येत नाही. त्यसाठी काही प्रयत्नही जाणीवपूर्वक करावे लागतात.त्यातला सर्वात महत्त्वाचा उपाय तज्ञांनी सांगितला आहे, तो म्हणजे आपल्या श्वासाबरोबर जगायचं. अर्थात तेही सोपं नाहीच, पण थोड्या प्रयत्नांनी ते जमू शकतं. निदान दिवसातला काही काळ, काही मिनिटं जरी तुम्ही तुमच्या श्वासाबरोबर म्हणजे वर्तमानात जगला, तरी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.जी वेळ आपल्या सोयीची असेल, दिवसाच्या त्या वेळी आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास कसा येतो, कसा जातो ते अनुभवा. श्वासाचा तो उबदार अनुभव घ्या. आपल्या पोटाकडे लक्ष द्या. प्रत्येक श्वास आणि उच्छवासाबरोबर आपल्या पोटाचीही हालचाल होते. पोटाची ती हालचाल कशी होते ते अनुभवा. श्वास घेताना शरीरात हवा भरली जाते. त्यामुळे श्वास घेताना आपलं पोट थोडं फुगलं पाहिजे आणि श्वास सोडताना हवा बाहेर पडते. अशावेळी आपलं पोट खाली गेलं पाहिजे. श्वासाची आणि पोटाची ही हालचाल आपल्याला वर्तमानात राहायला शिकवेल. त्यामुळे श्वासाचं, आपल्या जगण्याचं बोट धरा आणि भूतकाळ, भविष्यकाळातून वर्तमानात या. तो तुमचं जगणं अधिक आश्वस्त करील..