शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

एका काॅलवर मिळणार मानसिक समस्येविषयी मदत

By स्नेहा मोरे | Updated: October 10, 2022 08:57 IST

राज्यात ई-मानस प्रणालीचा आरंभ, जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने सुरुवात

- स्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनानंतर मानसिक आरोग्याचे महत्त्व पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले. मानसिक स्वास्थ्याचे हेच महत्त्व लक्षात घेऊन राज्यात आता ई-मानस प्रणालीचा आरंभ होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे पहिले केंद्र आज, सोमवारी ठाणे येथील मानसोपचार रुग्णालयात सुरु केले जाणार आहे. शिवाय, भविष्यात अन्य जिल्ह्यांत या सेवेचा विस्तार करून एका कॉलवर मानसिक आरोग्यविषयक समस्येविषयी मदत मिळणे सोपे होणार आहे. 

ई-मानस प्रणाली अंतर्गत प्रथमच राज्यातील मानसिक सेवा देणाऱ्या संस्था, तज्ज्ञ यांच्यासह उपचार घेणाऱ्या रुग्णांची ऑनलाइन नोंद केली जाणार आहे. या प्रणालीत मानसिक आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांसह सर्व रुग्णांची नोंद ठेवणे बंधनकारक असेल. कर्नाटक सरकारने यासाठी सुरू केलेली ई-मानस प्रणाली खरेदी केली आहे. ही प्रणाली बंगळुरूच्या आयआयटी आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या निमहान्स संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. याच प्रणालीत काही बदल करून राज्यात वापरण्यात येणार आहे.

प्रणालीचे महत्त्व    ई मानस प्रणालीमध्ये राज्यात मानसिक आरोग्य सेवा देणारी सरकारी तसेच खासगी रुग्णालये, दवाखाने इत्यादी आस्थापनांना नोंदणी करणे बंधनकारक असेल.     यामध्ये मनोरुग्णांच्या पुनर्वसन केंद्राचीही नोंदणी केली जाईल. मनोरुग्णांच्या संपूर्ण तपशीलासह कोणते उपचार दिले जात आहेत. याची माहितीही आस्थापनांना यात अद्ययावत करणे बंधनकारक असेल.     रुग्णांची संपूर्ण माहिती यामध्ये असल्यामुळे रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यास यामुळे मदत होईल. राज्याने मानसिक आरोग्य सेवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यभरात आठ मानसिक आरोग्य पुनरावलोकन मंडळे सॉफ्टवेअरलाही जोडली जाणार आहेत. 

टेलिकन्सल्टेशन ठरेल वरदानसरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये, संस्थामधील मानसिक आरोग्याशी निगडीत तज्ज्ञ, रुग्ण यांचा अद्ययावत तपशील या प्रणालीद्वारे संकलित करण्यात येणार आहे. ई मानस प्रणालीचे काम करणारे पहिले केंद्र ठाण्यात कार्यरत होणार आहे. त्यानंतर या प्रणालीचा विस्तार पुणे, बीड, नागपूर येथे केला जाईल. नागपूर येथील एम्समध्ये असणारे केंद्र सर्व प्रणालीच्या मेन्टॉरिंगचे काम पाहणार आहे. प्रत्येक केंद्रात आठ समुपदेशक असतील. शिवाय, मानसोपचारतज्ज्ञ, व अन्य वैद्यकीय अधिकारी मिळून २० जणांची टीम असेल. टेलिकन्सल्टेशनच्या माध्यमातून रुग्णांना मदत मिळणे सोपे ठरणार आहे. - डॉ. साधना तायडे, आरोग्य संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग