शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Health : ​का २०-३० वयातच पुरुषांना सतावते केस गळतीची समस्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:45 IST

या चार उपायांनी तरुण टक्कल होण्यापासून थांबवू शकतात, जाणून घ्या ती कारणे...!

गेल्या काही वर्षांपासून भारतीय पुरुषांमध्ये अकाली केस गळतीची समस्या वाढतच आहे. केस गळतीच्या समस्येने त्रस्त असण्याºया १० लोकांमध्ये सुमारे आठ पुरुष आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए) नुसार, केस वाढविण्यासाठीची सर्जरी करणाऱ्यांचे प्रमाण २० ते ३० वयोगटामध्येच अधिक आहे. विशेषत: बरेच बॉलिवूड स्टार्सदेखील या समस्येपासून सुटले नाहीत. शेवटी त्यांनी हेअरप्लांटची शस्त्रक्रिया करुन आपल्या लुक बदलला आहे. एखाद्या व्यक्तीचे दिवसातून ५० ते १०० केस गळत असतील तर ती गोष्ट सामान्य आहे. मात्र यापेक्षा जास्त केस गळत असतील तर ही समस्या मोठी असू शकते. या समस्येला एलोपेसिया म्हणतात. अकाली केस गळतीच्या समस्येचे सर्वात प्रमुख कारणे म्हणजे मानसिक तणाव, धूम्रपान, मद्यपान, प्रदूषण आणि पौष्टिक आहाराची कमतरता होय.आयएमएचे अध्यक्ष डॉ. के . के. अग्रवाल यांनी सांगितले की, एलोपेसिया विशेषत: अनुवांशिक असतो. मात्र जीवनशैलीत बदल आणि मानसिक आणि शारीरिक तणावाच्या कारणानेदेखील तरुणांना ही समस्या भेडसावत आहे. विशेषत: तीन महिन्याच्या कालावधित केस गळतात, या व्यतिरिक्त काही आजार जे विषारी पदार्थांपासून होतात, त्या कारणानेही केस गळू शकतात.  तणावपूर्ण नोकरी आणि जंकफूडची सवय असेल तरीही केस गळतात. यात पोषक तत्त्व आणि फायबरचा अभाव असतो. पूरेशा प्रमाणात पाणी न पिणे, धुम्रपान करणे आणि अल्कोहोलचे अधिक सेवन केल्यानेही अकाली केस गळू शकतात.     काय उपाय कराल? * या समस्येपासून सुटका हवी असल्यास जीवनशैलीत साधारण बदल करणे आवश्यक आहे, ज्यात सात तास गाढ झोप, पूरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन आणि प्रोटिनयुक्त आहाराचे सेवन आदी.    * या व्यतिरिक्त डोक्याचा कोमट तेलाने मसाज करावा, यामुळे ब्लड सर्कुलेशन चांगले राहते आणि केसांचे रोम छिद्रे खूले राहतात.  * योग आणि ध्यानधारणा करून तणावापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. तणावामुळे एपिनेफ्रीन आणि कोर्टिसोल हे हार्माेन्स केसांच्या प्राकृतिक विकासात बाधा घालतात. * केसांना पोषकत्व मिळण्यासाठी ताजे फळ आणि भाजीपालाचे सेवन करावे. ज्या पदार्थांमध्ये लोह, जस्ता, प्रोटीन आणि ओमेगा 3 फॅटी एसिड भरपूर प्रमाणात आहे अशा पदार्थांचा भरपूर उपयोग करा. या व्यतिरिक्त धुम्रपान आणि मद्यपान करणे टाळावे.      Also Read : ​Beauty : डोक्यावर नवे केस हवे असल्यास या तेलाचा असा करा वापर !                   : ​HEALTH TIPS : केस गळतीची समस्या आहे, तर रोज ‘हे’ खा !