शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

Health Tips : ...तर हे आहे टायगर श्रॉफचे फिटनेस रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 18:57 IST

टायगरने फिटनेसच्या काही टिप्स सांगितल्या असून त्या फॉलो केल्यास आपणही आपले व्यक्तिमत्व आकर्षक करू शकता.

-Ravindra More‘हीरोपंती’ या चित्रपटाद्वारे आपल्या करियरची सुरुवात करणारा टायगर सध्या हॉलीवूडच्या ‘रँम्बो’ या गाजलेल्या सिनेमाच्या बॉलीवूडमधील रीमेक मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात टायगर मुख्य भूमिका साकारणार असून त्याच्या फिटनेसमुळे त्याची निवड झाली असल्याची चर्चा आहे. टायगर आपल्या फिटनेससाठी खूपच काळजी घेत असतो. त्याने आपल्या चाहत्यांसाठीदेखील फिटनेसच्या काही टिप्स सांगितल्या असून त्या फॉलो केल्यास आपणही आपले व्यक्तिमत्व आकर्षक करू शकता.* टायगर श्रॉफने दिलेल्या खास टिप्स * टायगर कामाचा ताण कधीही घेत नाही शिवाय कितीही जबाबदारी वाढली तरी व्यायाम करायला कधीही विसरत नाही. यामुळे प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे फार गरजेचे आहे. टायगर रोज २ तास व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो. व्यायामुळे तुम्ही आकर्षक दिसण्यासोबत शरिरातील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. त्यामुळे तुमचे स्वास्थ उत्तम राहते.* टायगर सुंदर आणि ताजेतवाने दिसण्यासाठी नियमित पौष्ठिक आहार घेतो. जर आपण योग्य आहार घेतला नाही तर आपला व्यायाम करण्याचा काहीच फायदा होणार नाही. आहारात भरपूर प्रोटीन आणि विटामिन असलेला पदार्थांचा समावेश करा. रोजच्या आहारात सुकामेवा, अंडी, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, मांस आणि मासे यांचा समावेश असावा. जेवढे शक्य असेल तेवढे बाहेरचे खाणे टाळा. टायगर शरिरातून घातक गोष्टींचे उत्सर्जन करण्यासाठी दिवसातून ३ ते ४ वेळा ग्रीन टी घेतो.* टायगर श्रॉफ नितळ कांतीसाठी भरपूर पाणी आणि पुरेशी झोप घेतो. याचा परिणाम त्याच्या चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. अभिनय क्षेत्रामध्ये टायगरला कडक उन्हात स्टंट करावे लागतात, नाचावे लागते, गुंडाशी दोन हात करावे लागते. त्यामुळे त्याला प्रत्येक वेळेस ताजेतवाने दिसणे गरजेचे आहे.  * टायगर नेहमी त्वचेसाठी हानीकारक नसतील अशीच सौदर्यप्रसाधने वापरतो. टायगर सध्या एका विशिष्ट कंपनीचा फेसवॉश वापरतो. ज्यामध्ये मॅचा ग्रीन टी असते. ज्यामुळे चेहरा स्वच्छ होतो. तो दिवसातून फक्त २ वेळा याचा वापर करतो. Also Read : ​First look out : टायगर श्रॉफचा थक्क करणारा ‘रॅम्बो’चा फर्स्ट लुक रिलीज!