शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
4
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
5
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
6
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
7
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
8
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
9
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
10
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
11
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
12
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
13
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
14
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
15
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
16
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
17
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
18
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
19
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
20
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    

HEALTH : केस ​पांढरे होण्याची ‘ही’ आहेत कारणे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 15:35 IST

ही कारणे जाणून आपले केस नक्कीच पांढरे होणार नाहीत, जाणून घ्या काय आहेत कारणे !

सेलिब्रिटींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाइल आपण नेहमीच पाहतो. बहुतांश आपण त्यांना त्यांच्या हेअरस्टाइल मुळेच ओळखतो. हवी तशी हेअरस्टाइल ते करु शकतात, कारण त्यांचे केस निरोगी असतात. चकमदार, काळेभोर आणि घनदाट केस हे निरोगी केसांचे लक्षणे होय. निरोगी केसांसाठी प्रत्येक सेलेब्स काळजी घेत असतात. मात्र आपण आपल्या केसांची योग्य काळजी घेत नसल्याने केसांचे आरोग्य खराब होते आणि एैन तारुण्यात केस पांढरे होतात. पांढऱ्या केसांमुळे आपण म्हातारे दिसू लागतो. विशेष म्हणजे हेल्दी व्यक्तींचे केस सुद्धा पांढरे होतात आणि यामुळे त्यांचा लुक पूर्णत: खराब दिसू लागतो. * केस पांढरे होण्याची कारणे पांढऱ्या केसांची सुरुवात सर्वप्रथम पुरुषांच्या दाढीपासून आणि महिलांच्या कानाजवळील केसांपासून होते. केसांच्या समस्यांचे तज्ज्ञ सांगतात की, केस पांढरे होण्याची दोन कारणे असतात, ज्यात पहिले तणावाची स्थिती आणि दुसरे म्हणजे केसांना पोषक तत्त्वाची कमतरता होय. * तणावाची स्थिती या कारणाने केवळ संपूर्ण आरोग्यच खराब होत नाही तर याचा परिणाम आपल्या केसांवरदेखील होतो. ताणतणावात राहिल्याने केस तर पांढरे होतातच मात्र केसांच्या अन्य समस्याही निर्माण होतात. तणावात समतोल आहार घेतला जात नसल्याने आवश्यक पोषक तत्त्व शरीरास मिळत नाहीत सोबतच तणावात धुम्रपान, मद्यपान आदी व्यसनाचे प्रमाणही वाढते ज्याचा प्रतिकुल परिणाम शरीरावर होतो.  * केसांना पोषक तत्त्वांची कमतरताशरीरात विटॅमिन बी, आयर्न, कॉपर आणि आयोडिनची कमतरता भासल्याने केसांना आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाही. यामुळे केस गळती आणि केस पांढरे होण्याची समस्या निर्माण होते. तज्ज्ञांच्या मते, ही समस्या पूर्णत: बरी होणे कठीण आहे, मात्र डॅमेज कंट्रोल करुन ही समस्या अधिक वाढण्यापासून बचाव केला जाऊ शकतो. यासाठी आपणास फोलिक अ‍ॅसिड आणि व्यसनांपासून लांब राहावे लागेल. सोबतच आपल्या लाइफस्टाइलमध्येही काही बदल आणि डायटच्या साह्याने या समस्येपासून बचाव केला जाऊ शकतो.  Also Read : Beauty : दाढी-मिशीच्या पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी...!                   : ​HEALTH : पिकलेल्या केसांपासून मिळवा मुक्ती !