शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

Health : 'या' फायद्यांमुळे फुटबॉल खेळ खेळावा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 18:19 IST

हा खेळ खेळल्याने हाडांबरोबरच मांसपेशीही मजबूत होतात, ज्यामुळे आपले शरीर फिट आणि फाइन होण्यास मदत होई ल. यासाठी फुटबॉल खेळ आवर्जून खेळा.

मैदानी खेळ कुठलाही असो त्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. त्यातच फुटबॉल खेळ आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे एका संशोधनात आढळले आहे. विशेषत: बऱ्याच बॉलिवूड चित्रपटात फुटबॉलचे महत्त्व विषद करण्यात आले आहे. तर काही चित्रपटांचा आशयही फुटबॉल खेळावर आधारित आहे. त्यात ‘सिकंदर’, ‘कभी अलविदा ना कहेना’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘गोल’ आदी चित्रपटांचे नाव आवर्जून घेता येईल.संशोधनानुसार आठवड्यात तीन तास फुटबॉल खेळल्याने हाडे मजबूत व स्वस्थ राहतात. फुटबॉल खेळणाऱ्यांची हाडे पोहणारे किंवा सायकलिंग करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक मजबूत असतात. फुटबॉल खेळणे एक उत्तम प्रभाव असलेला व तीव्र व्यायाम आहे.एक्झेटर विद्यापीठातील संशोधक दिमित्रिस लाचोपोलस यांनी सांगितले की, ‘आमच्या संशोधनानुसार फुटबॉल खेळल्याने हाडांच्या विकासात पोहणारे किंवा सायकलिंग करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक सुधार जाणवला.’लाचोपोलस यांनी सांगितले, ‘जरी हे संशोधन आठवड्यात किमान नऊ तासापेक्षा अधिक फुटबॉल खेळणाऱ्यांवर केंद्रित असले तरी आठवड्यात तीन तास फुटबॉल खेळल्यानेही पुरेसा प्रभाव पडू शकतो.’ पोहणे व सायकलिंग यामध्ये भार देऊन अभ्यास करावा लागत नसल्यामुळे हाडांच्या विकासासाठी हे प्रकार फारसे परिणामकारक नाहीत. यासोबत भार द्यावा लागणाऱ्या व्यायामाचा समावेश केल्यास हे हाडांच्या विकासासाठी उपयोगी ठरेल.बालवयात जर फुटबॉल खेळ खेळला तर सुरुवातीपासून हाडे मजबूत होतील आणि भविष्यात हाडांच्या समस्या उद्भवणार नाहीत. शिवाय हा खेळ खेळल्याने हाडांबरोबरच मांसपेशीही मजबूत होतात, ज्यामुळे आपले शरीर फिट आणि फाइन होण्यास मदत होई ल. यासाठी फुटबॉल खेळ आवर्जून खेळा.