शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य शिबिरास जनसागर उसळला महाआरोग्य शिबिर: पहिल्याच दिवशी हजारो रुग्णांनी घेतला लाभ

By admin | Updated: January 9, 2016 23:23 IST

जळगाव : महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी शहरातील खान्देश सेंट्रल मॉल परिसरात अक्षरश: जनसागर उसळला होता. शेकडो नव्हे तर हजारो नागरिक या परिसरातील विविध कक्षांसमोर रांगा लावून उभे असल्याचे दृश्य पहायला मिळाले.

जळगाव : महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी शहरातील खान्देश सेंट्रल मॉल परिसरात अक्षरश: जनसागर उसळला होता. शेकडो नव्हे तर हजारो नागरिक या परिसरातील विविध कक्षांसमोर रांगा लावून उभे असल्याचे दृश्य पहायला मिळाले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरास शनिवारी सकाळी १० वाजेपासूनच प्रारंभ झाला. जिल्‘ातील कानाकोपर्‍यातून नागरिक या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आले होते.
विविध कक्षांसमोर लागल्या रांगा
शिबिरस्थळी असलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय कक्षासमोर सर्वाधिक रांगा होत्या. या परिसरात महिला व पुरुषांचे डोळे तपासणे व चष्मे वाटप, कॅन्सर रुग्णांची तपासणी केली जात होती. डोळ्यांचे विकाराचे हजारो रुग्ण रांगा लावून या कक्षाच्या बाहेर उभे होते. यात महिलांच्या व पुरुषांच्या रांगा वेगळ्या होत्या. उपाध्याय कक्षाच्या आतून निघालेली रांग बाहेर संपूर्ण मंडपाला वेढा देऊन पुढे जात होती. जवळपास पंधरा ते वीस तपासणी कक्ष या ठिकाणी होते.
-------
लहाने, महात्मेंचा पुढाकार
डोळे तपासणीच्या या कक्षात डॉ. तात्याराव लहाने, त्यांचे जे.जे. रुग्णालयातील २० ते २५ सहकारी, नागपूर येथील महात्मे आय बॅँक, आय हॉस्पिटलचे डॉ. विकास महात्मे हे स्वत: रुग्णांची तपासणी करून उपचार तसेच ऑपरेशनबाबत माहिती देताना दिसत होते. याच परिसरात कॅन्सर पीडितांसाठीही दोन कक्ष होते. औरंगाबाद व मुंबईतील नायर, जेे.जे. सायन हॉस्पिटलमधील तज्ज्ञ या ठिकाणी तपासणी करताना दिसत होते.
----
लहान बालकांसह माता,पिता रांगेत
लहान मुलांच्या विविध विकारांची तपासणी करून घेण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी कक्षासमोर मोठ्या रांगा होेत्या. पुणे येथील बी.जे. महाविद्यालयातील डॉक्टरांचे एक खास पथक डॉ. संध्या खडसे यांच्या नेतृत्वाखाली या शिबिर स्थळी आले होते. लहान, लहान मुलांच्या विकारांवर तज्ज्ञ सल्ला या ठिकाणी देण्यात येत होता. ऑपरशनची गरज असल्यास त्याप्रमाणे सल्ला दिला जात होता.
------
ट्रक भरून येत होती औषधी
रुग्णांना मोफत औषधी या ठिकाणी देण्यात येत होती. त्यासाठी मुंबईहून काही ट्रक भरून औषधी या ठिकाणी उतरविण्यात आली. औषधींचे खास कक्ष स्थापन करण्यात आले होते. मागणीनुसार दिनदयाल उपाध्याय, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, कवयित्री बहिणाबाई चौधरी, डॉ. अब्दुल कलाम कक्षांकडे औषधी पुरविली जात होती.
-----