शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Health Alert : चहा चपातीचा नाश्ता खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 18:06 IST

आपणही सकाळी चहा चपातीचा नाश्ता करीत असाल तर आपल्यासाठी हि माहिती अति महत्वाची आहे...

असे म्हणतात की, सकाळचा नाश्ता राजा सारखा, दुपारचे जेवण मध्यम आणि रात्रीचे जेवण गरीबासारखे करावे. असे केल्यास आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. मात्र सध्याच्या धावपळीच्या युगात बहुतांश लोकांना सकाळचा नाश्ता राजा सारखा करण्यास वेळच नाही, अगदी घाई घाईत मिळेल ते खाऊन घराबाहेर पडतात. त्यातच अनेकजण फक्त सकाळी बनणारी गरम गरम चपाती आणि चहा हा नाश्ता घेताना दिसतात. मात्र चहा चपातीचा हा नाश्ता खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का?       चहा चपाती एकत्र खाल्ल्याने त्यामधून मिळणारी पोषकद्रव्य फारच कमी असतात म्हणून नाश्त्याला चहा चपाती हा पर्याय फारसा आरोग्यदायी नसल्याचे चिफ डाएटिशन सुनिता रॉय चौधरी यांनी म्हटले आहे. सकाळी उठल्यानंतर शरीराला दिवसभर लागणारी उर्जा सकाळच्या नाश्त्यामधून मुबलक मिळणे गरजेचे आहे. चहा हे कॅफिनयुक्त पेय असल्याने दिवसाची सुरवात त्याने करणं आरोग्यदायी नाही. कोणताही अन्नपदार्थ चहासोबत घेणे त्रासदायकच आहे. तसेच चहा चपाती या कॉम्बिनेशनमधून आयर्न आणि कॅल्शियम शरीरात मुबलक प्रमाणात शोषले जात नाही. सकाळच्या नाश्त्यामधून काबोर्हायड्रेट आणि प्रोटीन घटक मुबलक मिळणे गरजेचे आहे. चहा चपातीमधून ही गरज पूर्ण होत नाही. परिणामी शरीराला उर्जा आणि पोषणद्रव्य यापैकी काहीच मिळत नाही.* नाश्त्यात वापरा हे हेल्दी पदार्थ चहा चपाती ऐवजी नाश्त्यात भाजी चपाती किंवा दही चपाती, अंड, दूध, पनीर यांचा समावेश करा. सोबतच काबोर्हायड्रेट्स मिळवण्यासाठी दलिया किंवा रव्यापासून बनवलेले पदार्थ म्हणजेच उपमा, अप्पम यांचा समावेश अधिक करा. इडली सांबार हा सकाळच्या नाश्त्याला एक उत्तम आणि परिपूर्ण पर्याय असून यातून शरीरला पोषकद्रव्य मिळण्यास मदत होते. Also Read : ​निरोगी जीवनासाठी ब्रेक फास्ट महत्त्वाचा                  : ​हेल्दी ब्रेकफास्ट हवाय ?