शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला आलाय का सोशल जेट लॅग ?

By admin | Updated: June 16, 2017 18:31 IST

आपण जास्त झोपा काढतोय का? -तपासा.

-निशांत महाजन

सोशल जेट लॅग. अशी एक नवीनच संकल्पना गेल्या आठवड्यात चर्चेत होती. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर तर ती खूपच गाजली. त्यावर अनेकांनी लगेच लेख लिहिले, अनेक ग्रूप्समध्ये या विषयांवर चर्चा तापली.मुद्दा काय, हा सोशल जेट लॅग असतो काय हा?शब्दांवरुन असं वाटू शकेल की हे प्रकरण काहीतरी सोशल मीडीयाशीच संबंधित असलं पाहिजे पण ते तसं नाही. सोशल मीडीयाशी संबंधित नसूनही गेल्या आठवड्यात सोशल मीडीयात या विषयाची प्रचंड चर्चा झाली.कारण सोशल मीडीया वापरणारे बहुसंख्य आपण या सोशल जेट लॅगच्या त्रासानं बाधीत आहोत की काय हे तपासून पाहू लागले.त्याच्या मुळाशी आहे, सध्याचं विकेण्ड कल्चर. आठवड्याचे पाच दिवस मरमर काम करायचं. रात्रीबेरात्री झोपायचं, सकाळी उठून पुन्हा आॅफिस. सोशल लाइफ फक्त आॅनलाइनच उरलेलं असतं. त्यात झोप होत नाही. म्हणून मग अनेकजण सुटीच्या दिवशी खूप झोपतात. दुपारी उठतात. जेवतात. पुन्हा झोेपतात. पण या अती झोपण्यानं शरीराचं घड्याळ बिघडतं, हार्ट अटॅकची शक्यता वाढते असं एका अभ्यासात समोर आलं आहे. आणि त्यालाच म्हणतात सोशल जेट लॅग. प्रवास करुन आल्यावर जशी झोप उडते, शरीराचं झोपेचं चक्र बिघडतं तसंच हे चक्र विकेण्डला बिघडतं. आणि मग त्यातून अनेक व्याधी सुरु होतात.या सोशल जेट लॅगची खूप चर्चा सोशल मीडीयातही गाजली. अनेकजण आपापले अनुभव शेअर करत मध्यरात्रीपर्यंत जागले. लवकर निजे, लवकर उठे हेच बरोबर होतं असं म्हणत अनेकजणांनी झोपेच्या वेळा पाळायचं ठरवलं.मात्र तसं सारं काही प्रत्यक्षात येईल का?हाच खरा प्रश्न आहे.कारण ते सध्या प्रत्यक्षात येत नाही. आणि सोशल मीडीयाच्या अती वापरामुळेच अनेकजण रात्री बेरात्री जागेच असतात. झोपेतून जाग आली तरी तेवढ्या रात्री व्हॉट्सअ‍ॅप चेक करतात. त्यावर काहीबाही वाचून अस्वस्थही होतात.हे सारं असंच चालू राहिलं तर आपला झोपेचं खोबरं होणं अटळ आहे. आणि त्याचे तब्येतीवरचे दुष्परिणाम?ते तर आजही होत आहेतच..