शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या चित्रपटासाठी सशक्त कथा आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 09:25 IST

 मराठी मालिका, हिंदी मालिका, मराठी व बॉलीवुड इंडस्ट्री या सर्व ठिकाणी आपले स्थान निर्माण केले आहे. या ग्लॅमर व स्वप्ननगरीने  या दिग्गज कलाकाराला मामा हे नाव दिले आहे. अशा या ताकदवान अभिनेत्याचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला सेलेब्रिटी रिपोटर्र.

मराठी इंडस्ट्रीला चार चॉंद लावणारे अशोक सराफ हे नाव बॉलीवुडमध्येदेखील तितक्याच ताकदीचे आहे. अशोक सराफ या मराठी कलाकाराने आपल्या विनोदी शैलीने रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. यामुळे या ताकदीच्या कलाकारांची दखल बॉलीवुडने देखील घेतलेली दिसते. बॉलीवुडचा एक्का असणारा दिग्दर्शक करण जोहर यांच्या १९९५ साली प्रदर्शित झालेल्या करण अर्जुन या चित्रपटात अशोक सराफ यांची असलेली मुंन्शीजीची भूमिका ही खरंच अविस्मरणीय आहे. तसेच मराठीमध्ये अशी ही बनवाबनवी, सगळीकडे बोंबाबोब, बाप रे बाप, दोन्ही घरचा पाहुणा, आयत्या घरात घरोबा,वाजवा रे वाजवा, घनचक्कर, माझा पती करोडपती, फेकाफेका असे एक से एक चित्रपट अशोक सराफ यांनी दिली आहेत.तसेच मराठी इंडस्ट्रीत जवळजवळ २५० पेक्षा ही जास्त चित्रपट या दिग्गज कलाकाराने केले आहे. बॉलीवुडमध्ये येस बॉस, सिंघम अशा हिट चित्रपटातूनदेखील त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तसेच त्यांनी मराठी मालिका, हिंदी मालिका, मराठी व बॉलीवुड इंडस्ट्री या सर्व ठिकाणी आपले स्थान निर्माण केले आहे. या ग्लॅमर व स्वप्ननगरीने  या दिग्गज कलाकाराला मामा हे नाव दिले आहे. अशा या ताकदवान अभिनेत्याचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला सेलेब्रिटी रिपोटर्र.मराठी चित्रपटांचे यश पाहता इंडस्ट्री बदलत आहे हे नक्की.कारण सध्या मराठी चित्रपटसृष्टीत चांगले विषय व कथा तेवढया ताकदीचे समोर येत आहे.समाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक सगळ््याच विषयांवर अनेक चित्रपट निर्माण होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसमोर वेगवेगळया व्हरायटी समोर येत आहे. प्रेक्षक देखील आपल्याला आवडेल व पटेल अशाच चित्रपटांना पसंती देत आहे. तसेच मराठी प्रेक्षक हे एखादा बिगबजेट बॉलीवुड चित्रपट आवडला तर थिएटरमध्ये जाऊन दोन किवा तीन वेळा पाहीन. पण मराठी चित्रपट हा आवडला तरी एकदाच पाहीन. बॉलीवुडच्या तुलेनत जर मराठी  प्रेक्षकांच्या आकडेवारीबाबत तुलना केली तर ते शक्य नाही.कारण बॉलीवुडचा प्रेक्षकवर्ग हा फार मोठा आहे.तर मराठी प्रेक्षक वर्ग हा मर्यादीत आहे.         ग्रामीण भागात पहिल्यापासून थिएटरची संख्या नसल्यामुळे तेथील प्रेक्षकांना चित्रपट जरी पाहता आले नाही तरी, त्यांच्यासाठी मनोरंजनाची अनेक साधने ेआहेत. टीव्ही, कंप्युटर, रेडिओ या माध्यमातून हा प्रेक्षकवर्ग आपले मनोरंजन करून घेत असतात. पण जरी मराठी चित्रपट थिएटरर्सला लागलेच तर तेथील प्रेक्षकाला तिकीट दर परवडण्यासारखा असेल का या गोष्टीचा देखील विचार केला पाहिजे. मराठी प्रेक्षक हा तितका श्रीमंत नाही की, दर शुक्रवारी जाऊन मराठी चित्रपटाचा आनंद घेवू शकतो. हा प्रेक्षकवर्ग या शुक्रवारी मराठी चित्रपट पाहीन पण पुढच्या आठवडयात पाहीनच याची शाश्वती कशी देवू शकतो.       एकाच आठवडयात चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होतात. पण यापैकी सगळेच चित्रपट चालतात असे नाही.एखादया चित्रपटाची कथा पॉवरफुल असेल तर तो बॉक्सआॅफिसवर यश मिळवितो. आणि त्याचबरोबर या चित्रपटातील कलाकाराला देखील काम केल्याचे समाधान मिळते. नुकताच बक्कळ पैसा आहे म्हणून चित्रपट काढणे योग्य नाही. त्यासाठी सशक्त कथादेखील असली पाहिजे. आणि ती प्रेक्षकांनी देखील आवडेल याचा विचार करणे देखील तितकेच आवश्यक आहे. कारण आजचा प्रेक्षक वर्ग हा फार चोखंदळ झाला आहे.         सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, कॉमेडी यामध्ये काय प्रेक्षक वर्ग हा विभागला जात नाही. या चित्रपटांचे प्रेक्षकवर्ग त्यांना आवडेल त्याच पद्धतीचा चित्रपट पाहतात. जर नाटक आणि चित्रपट म्हणाल तर नक्कीच या दोघांचा प्रेक्षकवर्ग हा पूर्णपणे वेगळा आहे. नाटक पाहणाºया प्रेक्षकवर्गाची संख्या ही तितकीच वाढत चालली आहे हे ही म्हणण्यास हरकत नाही.             चित्रपटाची प्रसिद्धी ही कायम प्रमोशनवर अवलंबून नसते. उलट हा प्रमोशनचा फंडा बॉलिवुडवाल्यांकडून आलेला प्रकार आहे. प्रमोशन करणे ही एक स्टाईल झाली आहे. पण प्रेक्षकवर्ग अशा कोणत्याही स्टाइलला बळी न पडता त्याला आवडेल तोच चित्रपट पाहतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.