शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

महाआरोग्य शिबिरासाठी मुख्यमंत्री ९ रोजी शहरात गिरीश महाजन यांचा पुढाकार: दिग्गज डॉक्टरांसह प्रमुख मंत्र्यांची उपस्थिती

By admin | Updated: December 23, 2015 00:18 IST

जळगाव : आरोग्य सेवा क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून येत्या ९ ते १२ जानेवारी या कालावधित महाआरोेग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आरोग्य क्षेत्रात लौकिक प्राप्त डॉक्टरांची या शिबिरास उपस्थिती लाभणार आहे. या शिबिराचे उद्घाटन ९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून राज्याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांची या सोहळ्यास उपस्थिती लाभणार आहे.

जळगाव : आरोग्य सेवा क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून येत्या ९ ते १२ जानेवारी या कालावधित महाआरोेग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आरोग्य क्षेत्रात लौकिक प्राप्त डॉक्टरांची या शिबिरास उपस्थिती लाभणार आहे. या शिबिराचे उद्घाटन ९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून राज्याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांची या सोहळ्यास उपस्थिती लाभणार आहे.
जिल्‘ातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात सतत पुढाकार असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून नववर्षात ९ ते १२ या कालावधित महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यांची लाभणार उपस्थिती
या शिबिरासाठी जगविख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. भ˜ाचार्य, डॉ.अमित मानदेव, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. उधाणी, डॉ. कीर्तने, डॉ.देवपुजारी, डॉ. बिडवे, डॉ. प्रधान, डॉ.आंबर्डेकर, डॉ. नागदा, डॉ. मानसिंग पवार, डॉ. संचेती, डॉ. हार्डिकर, मुंबईती नायर हॉस्पिटलचे डिन डॉ. भारमल, डॉ. सुलेमान मर्चंट, डॉ. चौरसिया यांच्यासह अनेक तज्ज्ञांची उपस्थिती लाभणार आहे. जळगाव शहरातील जी.एस.मैदानावर या डॉक्टर्सचा चार दिवस मुक्काम असेल. विविध व्याधींवर तपासणी व उपचार हे डॉक्टर्स करतील.
प्रमुख मंत्र्यांची हजेरी
या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, महसूल मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बाबट आदींची उपस्थिती असेल. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे चारही दिवस शिबिर स्थळी हजेरी लावणार आहेत. या शिबिराच्या पूर्वतयारीसाठी येत्या २७ रोजी काही तज्ज्ञ डॉक्टर्सची एक बैठक जळगाव येथे आयोजिण्यात आली असल्याचे रामेश्वर नाईक यांनी सांगितले.