शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भावी डॉक्टर तुम्हीसुद्धा... तणावात? कारणे वेगवेगळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2022 11:17 IST

अलीकडेच २५ ऑगस्ट आणि २१ सप्टेंबर रोजी अनुक्रमे केईएम आणि नायर या रुग्णालयातील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. वैद्यकीयसारखे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कोणत्या तणावाला सामोरे जावे लागत असेल?

संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी द्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता इतरांच्या तुलनेत नक्कीच चांगली असते. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एका विशिष्ट टप्प्यावर नैराश्य ग्रासते आणि त्यातून आत्महत्येसारख्या घटना घडतात. वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत असताना तरुण भावी डॉक्टरांच्या आयुष्यात एवढा तणाव का निर्माण होत असावा, यामागची कारणे वेगवेगळी असली तरी इतिहासात प्रथमच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) याची गंभीर दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील सर्व मेडिकल कॉलेज आणि विद्यापीठांत किती विद्यार्थांनी आत्महत्या केल्या, त्याचप्रमाणे  किती विद्यार्थी अभ्यासक्रम अर्धवट सोडून गेले इत्यादी माहिती आयोगाने मागवली आहे. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी किती तास काम करतात आणि त्यांना साप्ताहिक रजा कधी दिली जाते, ही माहितीही आयोगाने मागितली आहे. ही सर्व माहिती ७ ऑक्टोबरपर्यंत आयोगाच्या कार्यालयात ई-मेलद्वारे कळविणे अपेक्षित होते. 

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड), ही राज्यातील रेसिडेंट डॉक्टरांची अधिकृत संघटना. ही ५० वर्षांंपेक्षा जुनी संघटना निवासी डॉक्टरांच्या न्यायहक्कासाठी भांडत असते. दरवर्षी या संघटनेचे पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले नवनवीन पदाधिकारी आपल्या मागण्यांचे पत्रक घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटत असतात.  १४ वर्षांपूर्वी जे जे रुग्णालयात शिकणारे आणि मार्डचे अध्यक्षपद भूषविणारे  डॉ. योगानंद पाटील म्हणाले, निवासी डॉक्टर म्हणून विद्यार्थ्याला शिकण्याची भूक असतेच, मात्र तोही एक माणूसच आहे, हे विसरता कामा नये. त्यालाही भावभावना आहेत याचे भान बाळगले जाणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक रुग्णालयांशी संलग्न असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत शिकणाऱ्या निवासी डॉक्टरला २४ तास काम करावे लागते. त्यात त्याची दमछाक होते. त्यालाही विरंगुळ्याची गरज असते. दिवसातील काही तास त्याला विश्रांती मिळेल का, या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. 

नैराश्यग्रस्तांना मदतीचा हात देणे गरजेचे एमबीबीएसचे शिक्षण घेत असताना विद्यार्थी आनंदी असणे अपेक्षित असते. वैद्यकीय अभ्यासक्रम हा इतर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांपेक्षा वेगळा आहे. येथे विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस लागतो. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी घरंदारं सोडून डॉक्टरी शिकण्यासाठी शहरातील महाविद्यालयांच्या वसतिगृहात राहत असतात. घरापासून दूर शहरी वातावरणात राहून वैद्यकीयसारखा विषय शिकणे तसे जिकिरीचेच असते. या तणावामुळे कधी हे विद्यार्थी एकलकोंडे बनतात. त्यांना नैराश्य येते. अशावेळी त्यांना कोणीतरी मदतीचा हात देणे अपेक्षित असते. - डॉ. जयेश लेले, राष्ट्रीय सरचिटणीस, इंडियन मेडिकल असोसिएशन

वेळेवर उपचार मिळणे आवश्यकमेडिकलचे शिक्षण घेतेवेळी विद्यार्थ्यांना रुग्ण तपासणी, त्यांच्या चाचण्यांचे अहवाल, वॉर्डचे राउंड, अभ्यास या सर्व गोष्टींचा ताळमेळ साधावा लागतो. काही विद्यार्थी  भावनिकदृष्ट्या सक्षम नसतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व अपरिपक्व असते. अशा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची गरज असते. माझ्या काळात आम्ही कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून विद्यार्थी स्तरावर वेगवेगळे प्रयोग राबविले होते. कुणी विद्यार्थी नैराश्यग्रस्त वाटला तर त्याची कुठेही बाहेर ओळख न होऊ देता त्याच्यावर गरजेचे उपचार किंवा समुदेशन केले जायचे. २००२ ते २०१९ या काळात केईएम रुग्णालयात एकही अशी दुर्दैवी घटना घडली नव्हती.- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचारतज्ज्ञ आणि केईएमच्या माजी अधिष्ठाता

टॅग्स :doctorडॉक्टर