शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

थंडीची मजा औरच, पण काळजीही घ्यायलाच हवी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:13 IST

‘विंटर सेट’वरचा खर्च आवश्यकच!

ठळक मुद्देडॉक्टरांचं म्हणणं आहे, थंडी कमी वाजत असली, वाटत असली तरी थंडीत गरम कपडे वापरलेच पाहिजेत.आपलं कान, डोकं, पाय, शरीर योग्य पद्धतीनं झाकलंच पाहिजे. ‘विंटर सेट’वर केलेला खर्च अंतिमत: खूपच फायद्याचा असतो.कारणाशिवाय उगाच आपलं शरीर फार उघडं ठेऊन फिरलं तर आपल्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता त्यामुळे विनाकारण वाया जाते.

- मयूर पठाडेया थंडीचा खरंच काही भरवसा नाही.. किती वाढावी थंडी? ती आपली रोज वाढतेच.. आज कमी होईल, उद्या कमी होईल असं आपल्याला भले कितीही वाटू देत, पण हवामान खातं दर दोन-चार दिवसांनी सांगतंच, ‘महाराष्टÑात येत्या दोन दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढणार!’..आताही बघा, पार संक्रांत आली, तरीही थंडी आपली कमी व्हायला काही तयारच नाही! म्हणजे आता ती थोडी कमी झालीय, पण आणखी वाढणारच नाही, असंही काही सांगता येत नाही..थंडीची अनोखी मजाही असतेच. इतर ऋतूत ही मजा अनुभवता येत नाही. थंडीत उशीरापर्यंत गोधडीत लोळत पडायला तसं छानच वाटतं, पण नुसतं वाटून काय उपयोग? तुम्हाला रोज शाळा, कॉलेजांत जायचंच आहे, सकाळी लवकर उठायचंच आहे, अभ्यास, होमवर्क तर काही चुकत नाही. खेळाडूंनाही सकाळी लवकर उठावंच लागतं. थंडीत व्यायाम करायचं तुम्ही मनावर घेतलं असलंत तर गोधडी दूर फेकून कुडकुडत बाहेर पडावंच लागतं..अर्थात काही जण ऐटीत सांगतातही, ह्यॅ, ही काय थंडी आहे? अजून खरी थंडी तर पडायचीच आहे.. मी बघा कसं, कोणतेही गरम कपडे न घालता कसं बाहेर पडतोय ते! अर्थात बºयाचदा ते अर्धसत्य असतं. कारण त्यालाही थंडी वाजतच असते, पण मोठेपणा मिरवण्याचा हा शो ते आनंदानं खेळत असले तरी त्याचा व्हायचा तो परिणाम होतोच !डॉक्टरांचं म्हणणं आहे, थंडी कमी वाजत असली, वाटत असली तरी थंडीत गरम कपडे तुम्ही वापरलेच पाहिजेत. आपलं कान, डोकं, पाय, शरीर योग्य पद्धतीनं झाकलंच पाहिजे. ‘विंटर सेट’वर केलेला खर्च हा अंतिमत: खूपच फायद्याचा असतो. कारणाशिवाय उगाच आपलं शरीर फार उघडं ठेऊन फिरू नये. कारण आपल्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता त्यामुळे विनाकारण वाया जाते.तुम्ही अगदी कितीही मोठे स्पोर्ट्समन असलात, मैदानावर जाऊन घाम गाळत असला, तरी थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे. थंडीत त्वचा कोरडी पडते. याकडेही कटाक्षानं लक्ष द्यायला हवं, नाहीतर आपल्या त्वचेचीही वाट लागू शकते..