शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोज प्लास्टिकच्या डब्यातलं अन्न खाताय? - सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 15:04 IST

प्लास्टिक कंटेनरमधील अन्न खाल्यानं उद्भवतील आरोग्याच्या अनेक समस्या

ठळक मुद्देप्लास्टिकच्या डब्यातलं किंवा प्लास्टिक कंटेनरमधलं अन्न खाणं आरोग्याला हानिकारक.हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.डायबेटिसचा धोका वाढू शकतो.इतर आजारही तुमच्यावर कुरघोडी करु शकतात.

- मयूर पठाडेरोजच्या कामाच्या धबडग्यात आपलं जेवणाकडे दुर्लक्ष होतंच. वेळच्या वेळी जेवण करायचं कितीही म्हटलं तरी ते होत नाहीच. काही ना काही काम निघतं, हातातलं काम सोडवत नाही, डेडलाइन मागे लागलेली असते.. वेळच्या वेळी जेवण होत नाही ते नाहीच, पण निदान ज्या डब्यातलं आपण खातोय, तो तरी व्यवस्थित आहे की नाही? समजा डबा सोबत नेलाच नसेल, बाहेरचंच काही आपण खात असू, तर ते पदार्थ कशात पॅक केलेले असतात?..तपासून पाहा स्वत:लाच. आपलं जेवण कशात पॅक केलेलं असतं? तुमचा डबा प्लास्टिकचा आहे का? किंवा बाहेरुन जे पदार्थ तुम्ही मागवता, ते कशात गुंडाळलेले असतात. प्लास्टिकचा आणि तुम्ही जे काही अन्न खाता, त्याचा काही संबंध आहे का?तुम्ही कायम प्लास्टिकच्या डब्यातलं अन्न खात असाल किंवा पॅक्ड फूड जे प्लास्टिक कंटेनरमध्ये असेल, त्याचा जर आस्वाद तुम्ही घेत असाल, तर तुम्हाला नक्कीच ते महागात पडू शकतं.पाण्यासाठी प्लास्टिकची बाटली, प्लास्टिकच्या प्लेट्स.. या गोष्टीदेखील तुमच्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात.काय आहेत प्लास्टिकचे धोके?१- प्लास्टिकच्या संपर्कात असलेले खाद्यपदार्थ जर तुम्ही सतत खात असाल, तर लक्षात ठेवा, तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.२- प्लास्टिकच्या संपर्कातील अन्न दुषित होऊन त्यामुळे ब्लड प्रेशरच्या संदर्भातील तुमच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.३- भले तुम्ही आरोग्याची काळजी घेत असाल, पण प्लास्टिक कंटेनरमधील अन्न खाल्यामुळे तुम्हाला डायबेटिसचा धोका वाढू शकतो आणि इतर आजारही तुमच्यावर कुरघोडी करु शकतात.४- प्लास्टिक पदार्थातील अन्न सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील थॅलेट्सचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते.५- पाश्चात्य देशात सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅक्ड फूड खाणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरात थॅलेट्सं प्रमाण अधिक आढळून येतं आणि त्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणामही तुलनेनं जास्त आहे.