शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

Fitness : ​जास्तच सडपातळ आहात का? वापरा हे फुड्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 14:40 IST

जर आपणही आपले वजन वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले असतील तर काही घरगुती उपायांद्वारे आपल्या सडपातळपणाला दूर करु शकता. जाणून घेऊया त्या उपायांबाबत...

बरेचजण जरा जास्तच सडपातळ असतात. आपणही सेलिब्रिटींसारखे फिट दिसावे, आपली पर्सनॅलिटी चारचौघात उठून दिसावी असे सडपातळ व्यक्तींना नेहमी वाटत असते. बऱ्याचदा यासाठी ते खूप प्रयत्नही करतात, मात्र पदरी निराशाच पडते. जास्त सडपातळपणा आपल्या पर्सनॅलिटीवर विपरित परिणाम करतो. आपले शरीर जास्त लठ्ठही नको आणि जास्त सडपातळही नको. सडपातळपणामुळे कोणताही ड्रेस परिधान केला तर तो चांगला दिसत नाही. बऱ्याचदा याच सडपातळपणामुळे लोकांना लाजिरवाणे व्हावे लागते. जर आपणही आपले वजन वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले असतील अणि फायदा मिळाला नसेल तर काही घरगुती उपायांद्वारे आपल्या सडपातळपणाला दूर करु शकता. जाणून घेऊया त्या उपायांबाबत... * चणादाळ दुबळेपणा दूर करण्यासाठी चणादाळ उपयोगात येऊ शकते. यासाठी रोज रात्री ८ ते ९ चमचे चणादाळ पाण्यात भिजवून ठेवा, त्यानंतर सकाळी या दाळमध्ये बेदाणे आणि मिश्री मिक्स करून सेवन करावे.  * मनुके मनुके सेवन केल्याने बरेच आजार दूर होतात, मात्र ७ ते ८ मनुके गरम पाण्याने धुवून रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हेच पाणी सेवन करा. यानेही दुबळेपणा कमी होऊ शकतो.  * मध आणि हळद एक चमच मधात एक चमच हळद पावडर एकत्र करा. या मिश्रणाचे रोज सेवन करावे. या उपायानेही दुबळेपणा दूर होऊन वजन वेगाने वाढू शकते.   * केळी  केळीचे सेवन केल्यानेही बऱ्याच आरोग्याच्या समस्या दूर होतात. शिवाय वजनही वेगाने वाढविता येते. रोज सकाळ-संध्याकाळ दोन-तीन केळीसोबत एक ग्लास दूधाचे सेवन करावे.  * ड्राय फ्रूट्स दुबळेपणा दूर करायचे असल्यास डायटमध्ये ड्राय फू्रट्सचा समावेश असावाच. त्यात बदाम आणि काजू एक ग्लास दुधात मिक्स करुन रात्री झोपण्याअगोदर सेवन करावे.  * दालचिनी एक ग्लास दुधात एक चमच दालचिनी पावडर आणि मध मिक्स करुन सेवन करावे. यानेही वजन वेगाने वाढण्यास मदत होते.