रविवारसाठी फिचर (जोड)
By admin | Updated: January 30, 2015 00:54 IST
-पेढीतील दूध बाळाच्या आरोग्यासाठी सुरक्षित
रविवारसाठी फिचर (जोड)
-पेढीतील दूध बाळाच्या आरोग्यासाठी सुरक्षित आईच्या दुधाएवढंच हे दूध सुरक्षित असल्याचा दावा, डॉक्टरांनी केला आहे. त्यांच्या मते बाळंतपणानंतर निरोगी प्रकृती असणाऱ्या स्त्रीच्या दुधाची साठवण केली जाते. दूध हे शास्त्रोेक्त पद्धतीने साठवलं जातं. ब्रेस्ट पंपाच्या मदतीने स्टील कंटेनरमध्ये सर्वात आधी थोडं म्हणजे साधारण पाच मिलिलिटर दूध काढून घेतलं जाते. मग हे दूध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं जाते. प्रयोगशाळेतून दुधाची शुद्धता तपासल्यावर आईकडून जास्त दूध घेतले जाते. दुधाचं कल्चर केले जाते. या प्रक्रि येमुळे दूध स्तनपानाच्या दुधाइतकंच चांगलं आणि पौष्टिक राहतं. बॉक्स.-मातृदुग्ध पेढीचा पर्याय योग्यआईचं दूध उपलब्ध न होऊ शकणाऱ्या बाळांसाठी मातृदुग्ध पेढीचा पर्याय योग्य आहे. बाळाला पहिलं चिक दूध पाजलंच पाहिजे; पण कधी कधी दुर्दैवाने आईचं दूध बाळाला देता येत नाही. तेव्हा पर्याय उरतो तो मिल्कबँकचा. सायन हॉस्पिटलनंतर आता कामा, केईएम आणि जे.जे. हॉस्पिटलमध्येही मातृदुग्ध पेढ्यांची सुरु वात झाली आहे. २०१२ साली रोटरी क्लब ऑफ ठाणे (नॉर्थ एण्ड) यांच्या पुढाकाराने ठाणे महापालिकेच्या कळवा हॉस्पिटलमध्येही मातृदुग्ध पेढीची स्थापना झाली. नागपुरातही ही सुरुवात सर्व शासकीय इस्पितळांमध्ये व्हावी, याचा फायदा नवजात शिशुलाच होईल. -मेधा पुंडलिक सामाजिक कार्यकर्त्या, मातृसेवा संघ फाऊंडलिंग होम