शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तुम्हालाही उभे राहून जेवण करण्याची सवय आहे? वेळीच व्हा सावध नाहीतर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 13:40 IST

आजकाल पार्ट्यांमध्ये किंवा एखाद्या लग्न समारंभात उभे राहून जेवण करणं हा एक नवा ट्रेंड आलाय. 

Health Tips : हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपापल्या सोयीनूसार काही सवयी अंगी लावून घेतो. ज्या घातक सवयी रोगांना आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यातील सर्वात नुकसानकारक सवय म्हणजे उभे राहून जेवन करणे. काही लोक वेळेच्या अभावामुळे घाईगडबडीत उभे राहूनच जेवण करतात. लग्न समारंभात किंवा पार्टीच्या ठिकाणी उभे राहून जेवण करणे म्हणजे कल्चरचा भाग समजला जातो. 

पूर्वीच्या काळी खाली जमिनीवर मांडी घालून जेवायला बसण्याची पद्धत होती. अलिकडे ही परंपरा लुप्त होत चालली आहे. बदलत्या काळानूरूप प्रत्येकाची जेवण करण्याची पद्धत वेगळी होत चालली आहे. काहींना उभे राहून जेवण करण्याची सवय असते तर काही जण डायनिंग टेबलवर बसून जेवण करतात. 

पोटातील समस्यांमध्ये वाढ - 

आरोग्य तज्ञांनूसार, उभे राहून जेवण करणे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते.पाहायला गेल्यास जेव्हा आपण उभे राहून जेवण करतो त्यावेळी पोटात अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे जेवण पचण्याची प्रकिया हळूवार होते आणि अपचन होते. 

जर तुम्ही उभे राहून जेवण करत असाल तर त्यावेळेस अन्न सरळ आतड्यांपर्यंत पोहोचते.  ज्यामुळे पोटात दुखणे किंवा आतड्यावर सूज येते. जेव्हा आपण उभे राहून जेवण करतो तेव्हा ते खाल्लेलं अन्न पचन होण्यास जास्त वेळ लागतो. काही लोकांचे असेही म्हणणे आहे की उभे राहून अन्न खाल्ल्याने किडनीच्या समस्या आणि स्टोनचा धोका वाढतो.

खाली बसून जेवण्याचे फायदे  - 

पायांची घडी घालून बसल्याने नसांमधील ताण दूर होतो आणि त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. याउलट उभे राहून जेवण केल्यास शरीराचं पॉश्चर बिघडतं. त्याचे शरीरावर गंभीर परिणामही  होतात. याआधी लोक जमिनीवर खाली बसून जेवण करायचे.  खाली मांडी घालून जेवायला बसणे ही एकप्रकारे योगाभ्यासाची क्रियाच म्हणावी लागेल. मांडी घालून बसण्याच्या प्रक्रियेमुळे तुमची पचनक्रिया सुधारते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न