प्राणीजन्य रोग दिनानिमित्त पालिकेने केले ३४८ कुत्र्यांचे लसीकरण
By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST
प्राणीजन्य रोग दिनानिमित्त
प्राणीजन्य रोग दिनानिमित्त पालिकेने केले ३४८ कुत्र्यांचे लसीकरण
प्राणीजन्य रोग दिनानिमित्त ३४८ श्वानांचे लसीकरणपुणे : जागतिक प्राणीजन्य रोग दिनानिमित्त पालिकेच्यावतीने आज शहरात कुत्र्यांच्या लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील ३४८ कु त्र्यांना ॲन्टी रेबिजची लस देण्यात आली. पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणीजन्य रोग दिनानिमित्त आज क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत लसीकरण मोहिम राबविण्यात आली. यासाठी पथके स्थापन करण्यात आली होती. पालिकेच्या या कामामध्ये ब्ल्यु क्रॉस संस्था, पिपल्स फॉर ॲनिमल, सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या स्वयंसेवी संस्थांनीही भाग घेतला. याअंतर्गत कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत ६५ कुत्र्यांना, संगमवाडी क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत ७६ कुत्र्यांना, ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत ७५ कुत्र्यांना, सहकानगर क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत ६० कुत्र्यांना आणि धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत ७२ कुत्र्यांना ॲन्टी रेबिजची लस देण्यात आली.