शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

व्यायाम करताय, पण फ्लेक्जिबिलिटीचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 17:53 IST

ब्लड सर्क्युलेशन आणि इन्ज्युरीचा धोका टाळण्यासाठी ताणाचे व्यायाम आवश्यक

ठळक मुद्देव्यायामानंतर फ्लेक्जिबिलिटी एक्सरसाइजेस प्रत्येकानं करायला हवेत.त्यामुळे तुमच्या शरीराची लवचिकता वाढतेच, शिवाय आयुष्यही.आपले मसल्स रिलॅक्स होतात आणि शरीरातील जॉइन्ट्सही फ्लेक्जिबल राहतात. ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि इन्ज्युरीचा धोका खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो.

- मयूर पठाडेपुरुष असो किंवा स्त्री, व्यायाम सर्वांनाच अनिवार्य आहे आणि प्रत्येकाला आता त्याचं महत्त्व पुरेसं कळलेलंही आहे. त्यामुळे आजकाल व्यायामासाठी जिमला, जॉगिंग ट्रॅकवर किंवा घरातल्या घरातच काही ना काही व्यायाम करणाºयांची संख्या वाढत चालली आहे.पूर्वी व्यायामापासून दूर असणाºया स्त्रिया, तरुणीही आता व्यायामासाठी जिममध्ये जाताना दिसतात. पण कोणता व्यायाम करायचा, कोणत्या व्यायामानं काय फायदा होतो, याविषयी महिलांमध्ये अजूनही फारशी जागरुकता दिसत नाही. त्यामुळे इतर जण जे करतात तेच आपणही करायचं किंवा जिममधल्या ट्रेनरलाच ‘मी काय करू?’ असं विचारायचं आणि मग तो जे काही सांगेल तो व्यायाम करायचा.. हेच सूत्र आजकाल बव्हंशी दिसतं.व्यायाम करताना आपल्या शरीराचे ढोबळमानानं तीन भाग पडतात.पहिला प्रकार म्हणजे अप्पर बॉडी एक्सरसाइज, दुसरा प्रकार लोअर बॉडी एक्सरसाइज आणि तिसरा प्रकार म्हणजे अ‍ॅबडॉमिनल (पोटाचे) एक्सरसाइज.त्यासाठी, विशेषत: महिलांनी कोणता व्यायाम करायचा हे तुम्हाला माहीत आहे?तो माहीत करून घ्या आणि आपल्या जिममधल्या ट्रेनरलाही त्यासंबंधी विचारा.अप्पर बॉडी एक्सरसाइजेस- ट्रायसेप्स लिफ्ट्स, बायसेप कर्ल्स, चेस्ट आणि शोल्डर लिफ्ट्स, इत्यादि..लोअर बॉडी एक्सरसाइजेस- स्क्वॅट्स, इनर अ‍ॅण्ड आऊटर थाय लिफ्ट्स, प्लाइज, इत्यादि..अ‍ॅबडॉमिनल एक्सरसाइजेस- क्रंचेस, ट्विस्ट्स, प्लॅन्क, इत्यादि...हे सगळे व्यायाम करताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवली पाहिजे, या व्यायामानंतर फ्लेक्जिबिलिटी एक्सरसाइजेस प्रत्येकानं आवर्जुन करायला हवेत. त्यामुळे तुमच्या शरीराची लवचिकता वाढतेच, शिवाय आयुष्यही. त्यामुळे आपले मसल्स रिलॅक्स होतात आणि शरीरातील जॉइन्ट्सही फ्लेक्जिबल राहतात. शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्ज्युरीचा धोका खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो.