सात जणांना कुत्र्याचा चावा
By admin | Updated: May 2, 2016 20:35 IST
जळगाव : शहर व जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ सुरूच असून १ व २ मे रोजी सात जणांना कुत्र्याने चावा घेतला.
सात जणांना कुत्र्याचा चावा
जळगाव : शहर व जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ सुरूच असून १ व २ मे रोजी सात जणांना कुत्र्याने चावा घेतला. संदीप प्रल्हाद पाटील (३०, रा. आव्हाणे), रामलाल जामसिंग बारेला (२२, रा. वाघनगर), सकुबाई सोपान बिर्हाडे (६०, रा. गेंदालाल मिल परिसर) यांना २ मे रोजी कुत्र्याने चावा घेतला. तसेच कमलसिंग विश्रामसिंग पाटील (३१, रा. देवपिंप्री, ता. जामनेर), अक्षय विजय बारी (१९, रा. समतानगर), पंकज अर्जून चव्हाण (११, रा. सुप्रीम कॉलनी), खुशी अजय सरपटे (८, रा. नाथवाडा) यांना १ मे रोजी कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातात दोघे जखमीजळगाव- यावल तालुक्यातील चिंचोली येथे दुचाकी अपघातात संतोष धनसिंग पेडमांग (२२, रा. चिंचोली, ता. यावल), समाधान पंडीत साळुंखे (३६, रा. चिंचोली, ता. यावल) हे दोघे जण जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. इसमाने घेतले विषजळगाव- भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथील देवराम तुकाराम पेठकर (५१) यांनी विष प्राशन केले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.