शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नांच्या रहस्याचा उलगडा होतो का? मानसशास्त्रज्ञांनी केलेला परामर्श वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 08:26 IST

या अर्थ लावण्याचा उपयोग प्रत्यक्ष आयुष्यात कसा करता येईल याबद्दल विवेचन असेल आणि शेवटच्या लेखात स्वप्नांचा मेंदूच्या कार्यरचनेशी संबंध आणि स्वप्नांचे विकार यासंबंधात चर्चा असेल.

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा !स्वप्नांतील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?- सुप्रसिद्ध गीतकार सुधीर मोघे यांच्या या काव्यपंक्ती आपल्या सगळ्यांच्या मनातील स्वप्नांबद्दलचे कुतूहल यथार्थपणे वर्णन करतात. निद्रेसंदर्भातील प्रत्येक व्याख्यानानंतर,  मग ते डॉक्टरांकरिता असो अथवा सर्वसामान्यांकरिता असो, अमेरिकन किंवा भारतीय श्रोत्यांकडून स्वप्नांसंबंधी प्रश्न हमखास विचारला जातो.

स्वप्नांबद्दलचे हे कुतूहल साहजिक आहे.  अगदी पुरातन काळामध्ये बुधकौशिक ऋषीला पडलेले स्वप्न ‘रामरक्षास्तोत्र’  या नावाने प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक काळात, शिवाजीराजांना १६ व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पडले. या स्वप्नाच्या पूर्तीकरता सैन्याची, पर्यायाने शस्त्रनिर्मितीची नितांत गरज होती. ही गरज पैशाच्या अभावी पुरी झाली नसती. स्वराज्याची निर्मिती कठीण झाली असती. अशा अवघड वेळेला तोरण्याच्या पायथ्यापाशी असलेल्या गुप्तधनाचे स्वप्न शिवरायांना पडले आणि नेमके त्याच जागी मोहरांनी भरलेले घडे सापडले, अशी स्वप्नांची ऐतिहासिक महतीही आहे.

पुढील लेखांमध्ये आपण स्वप्नांसंदर्भातले अनेक प्रश्न अभ्यासणार आहोत. ह्या पहिल्या लेखामध्ये जनसामान्यांमध्ये कुठली स्वप्ने पडतात? प्राण्यांना स्वप्ने पडतात का? याचा परामर्श घेऊ या. पुढच्या लेखात स्वप्नांचा अर्थ वेदकाळापासून ते आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी लावायचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल माहिती असेल. या अर्थ लावण्याचा उपयोग प्रत्यक्ष आयुष्यात कसा करता येईल याबद्दल विवेचन असेल आणि शेवटच्या लेखात स्वप्नांचा मेंदूच्या कार्यरचनेशी संबंध आणि स्वप्नांचे विकार यासंबंधात चर्चा असेल. स्वप्न म्हणजे नक्की काय? याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद असला तरी या लेखापुरते स्वप्न, दिवास्वप्न आणि झोपेत चालणारे फुटकळ विचार यात फरक केला आहे. 

स्वप्न पाहणे म्हणजे झोपेमध्ये  अनुभूती / विचार अथवा भावना या प्रत्यक्षात घडत असल्याचा भास होणे. बहुतांश स्वप्नांमध्ये स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तींची भूमिका ही त्यात भाग तरी घेणारी असते अथवा एक प्रेक्षक म्हणून असतेच.  तसेच कुठली तरी कृती चालू असते. मग ती बघणे असेल अथवा पळणे / चालणे असेल, आणि इतर व्यक्तींबरोबर संवाद असेल!! बहुतांश स्वप्नांमध्ये स्वत:खेरीज एक तरी व्यक्ती किंवा प्राणी असतातच.

- डॉ. अभिजित देशपांडे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस iissreports@gmail.com