शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

किडनी स्टोनच्या ‘या’ आठ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 19:46 IST

सर्दी, खोकला, पाठदुखी, मानदुखी या आजारांची लक्षणे आपल्याला कळतात. मात्र, असे काही आजार असतात ज्यांची लक्षणं आपल्याला ठाऊक नसल्यानं आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आजारातील त्रास सहन करत राहिल्याने त्याचे दुरगामी परिणाम होत राहतात. त्यातला एक गंभीर आणि भयानक त्रासदायक आजार म्हणजे किडनी स्टोन.

निरोगी जीवन हाच सुखी आयुष्याचा मंत्र आहे. आपले स्वास्थ्य चांगले असेल तरच आपले आयुष्यात घडणाऱ्या  गोष्टींमध्ये रूची राहते. मग आजार कोणताही असो त्रास हा होतोच. सर्दी, खोकला, पाठदुखी, मानदुखी या आजारांची लक्षणे आपल्याला कळतात. मात्र, असे काही आजार असतात ज्यांची लक्षणं आपल्याला ठाऊक नसल्यानं आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आजारातील त्रास सहन करत राहिल्याने त्याचे दुरगामी परिणाम होत राहतात. त्यातला एक गंभीर आणि भयानक त्रासदायक आजार म्हणजे किडनी स्टोन. पाहूयात, काय आहेत या आजाराची लक्षणं...ही आहेत किडनी स्टोनची लक्षणे : * लघवी करताना त्रास होणे - किडनी स्टोनचा आजार असणाऱ्या  व्यक्तीला लघवी करत असताना प्रचंड वेदना, त्रास सहन करावा लागतो. वेळीच जर त्यावर उपचार झाले नाही तर हा आजार वाढण्याची शक्यता बळावते. हा त्रास जास्त काळ सहन केल्यास त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.                                                        * पोटाच्या बाजूला त्रास होणे - वारंवार पोटाच्या किनाऱ्याला त्रास होतो, असे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. कधीकधी हा त्रास पाठीलाही होऊ शकतो. जास्त दिवस हा त्रास सहन केल्यास अशक्तपणा जाणवू शकतो.*  पोटाच्या खालील भागाला वेदना- पोटाच्या खालच्या भागाला, मांड्यांमध्ये आणि पायामध्ये जर वेदना होत असतील तर याकडे दुर्लक्ष करू नये. कारण हा त्रास किडनी स्टोनचा असू शकतो. वेळीच सतर्क राहा.                                                               * त्रास कमी-जास्त होणे - पोटाच्या बाजूला कमी-जास्त प्रमाणात जर वेदना होत असतील आणि थोड्या थोड्या वेळाने जर असा त्रास होत आहे तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. * लघवीतून रक्त येत असेल तर...- लघवीमुळे शरीरातील निरोपयोगी घटक बाहेर सोडले जातात. मात्र, याशिवाय अन्य घटक बाहेर येऊ लागले तर चिंतेचे कारण ठरू शकेल. उदा. लघवीतून जर रक्त येत असेल तर हे किडनी स्टोनचे लक्षण असू शकते.* लघवीचा वास येत असेल तर...- लघवीचा तीव्र वास येत असेल तर वेळीच सावधान होणे गरजेचे आहे. कारण, किडनी स्टोन या आजारांत लघवीचा प्रचंड घाण वास येतो. हा त्रास असलेल्यांनी लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.* उलट्यांचा त्रास..- वारंवार उलट्यांचा त्रास होतो का? मळमळ होण्याची चिन्हे आहेत का? मग वेळीच सावध व्हा आणि तुम्हाला किडनी स्टोन तर नाही ना याची खात्री करून घ्या...* वारंवार लघवी येते का?- तुम्ही कुठेही असलात तरीही तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागते का? लघवी कंट्रोल करायला त्रास होतो का? मग एकदा किडनी स्टोन तर नाही ना याची खात्री करून घ्या.