शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

​ओळखा दिवाळीच्या मिठाईतील भेसळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 14:41 IST

सण-उत्सव म्हटला की, आनंदाची मेजवानीच असते.....

सण-उत्सव म्हटला की, आनंदाची मेजवानीच असते. त्यात नवनवीन कपडे, घरातील विविध वस्तू तसेच तोंड गोड करण्यासाठी असते ती मिठाई. मात्र कदाचित आपण खात असलेली मिठाई हे गोड विष ठरू शकते. हो हे खरे आहे, कारण आपण आणलेल्या लाडू, बर्फी, खवा यात भेसळ असू शकते. कारण या काळात विक्री व नफा वाढविण्यासाठी काही उत्पादक मिठाईत भेसळ करीत असतात. आजच्या सदरात आपण भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने शरीरावर काय दुष्परिणाम होतात, तसेच भेसळयुक्त मिठाई घरच्याघरी कशी तपासावी याबाबत जाणून घेऊयात...शरीरावर होणारे दुष्परिणामभेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने आतड्यांना नुकसान होऊन त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. तसेच फूड पॉयझनिंग तर होतेच शिवाय त्या व्यतिरिक्त किडनी आणि लिव्हर खराब होण्याची दाट शक्यता असते. कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. मिठाईत वापरले जाणारे आरारोट सारख्या पावडरमुळे मुलांची हाडे कमकुवत होतात तसेच जास्त साखर असलेली मिठाई सतत खाल्ल्याने मुलांना डायबिटीजदेखील होऊ शकतो.मिठाईतील भेसळ कशी ओळखालमिठाई रंग :मिठाईला आकर्षक व फ्रेश कलर देण्यासाठी मेटॅनिल यलो हा कृत्रिम रंग वापरला जातो. हे ओळखण्यासाठी मिठाईच्या तुकड्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे काही थेंब टाका. मिठाईला जांभळा रंग आल्यास त्यात कृत्रिम रंगाचा वापर केला असल्याचे समजते. तसेच मिठाई हातात घेतल्यानंतर हाताला जर रंग लागत असेल तर समजावे की, मिठाई भेसळयुक्त आहे. मेटॅनिल यलो आणि टारट्राजाइन असे पदार्थ वापरण्यास बंदी आहे. खवा:खव्यामध्येदेखील स्टार्च मिसळले जाते. ते ओळखण्यासाठी एका टेस्ट ट्यूबमध्ये थोडासा खवा घ्या व त्यात पाणी मिसळा. ते थोडे गरम करा. खवा गार झाल्यावर त्यात पाच थेंब आयोडिन टाका. जर खव्याचा रंग जांभळा झाला तर त्यात स्टार्च मिसळले आहे.    दूध:दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यात खडू पावडर, साबण पावडर, हायड्रोजन पेरॉक्साइड, यूरिया व पाणी मोठ्या प्रमाणात मिसळले जाते. हे ओळखण्यासाठी समान आणि स्वच्छ भागावर दुधाचे थेंब टाका. भेसळयुक्त दूध सगळीकडे पसरते तर शुद्ध दूध सरळ रेषेत वाहते. तसेच दूध घेतल्याच्या काही काळानंतर पिवळे पडले तर भेसळ समजावी आणि पांढरेच राहिले तर शुद्ध आहे असे समजावे. दुधाचे काही थेंब बोटावर घेऊन घासल्यास फेस आला तर भेसळ समजा. तसेच दुधाचे नमुने परीक्षानळीत घ्या व त्यात सोयाबिनची पावडर घाला, नळी हलवून त्यात रेड लिटमस पेपर टाका. दुधात युरिया असेल तर पेपर निळा होतो. दूध पावडरमध्येही कोल्टारडीजची भेसळ केली जाते. ते ओळखण्यासाठी सल्फ्युरिक अ‍ॅसिड टाकावे. जर पदार्थाचा रंग गुलाबी झाला, तर भेसळ असल्याचे ओळखावे. खाद्य तेल:खाद्य तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी यात खनिज तेल मिश्रीत केले जाते. ते ओळखण्यासाठी परीक्षा नळीत तेलाचा नमुना घ्या व त्यात पोटॅशिअम हायड्रॉक्साइड मिसळा. मिश्रण विरघळले तर तेल शुद्ध समजा. मिश्रणाचे दोन थर तयार झाले तर भेसळ ओळखा. तूप:तूपातही कोल्टारडीजची भेसळ केली जाते. ते ओळखण्यासाठी सल्फ्युरिक अ‍ॅसिड टाकावे. जर पदार्थाचा रंग गुलाबी झाला, तर भेसळ असल्याचे ओळखावे. रबडी:यात टिपकागदाची मोठी भेसळ केली जाते. ते ओळखण्यासाठी रबडीच्या नमुन्यात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे काही थेंब टाका, त्यात थोडे पाणी मिसळा व काच नळीने मिश्रण ढवळा. नळीवर तंतू जमा झाले तर कागदाची भेसळ समजा. चांदीचा वर्ख:बऱ्याचदा मिठाईवर चांदीच्या वर्खाच्या नावाने अ‍ॅल्युमिनियम फ्वॉइल वापरले जाते. ते ओळखण्यासाठी चांदीचा अर्क जाळा. खरा चांदीचा अर्क जाळल्यास तो लहानशा बॉल प्रमाणे दिसेल तर अ‍ॅल्युमिनियम फ्वॉइल घट्ट स्लेटी (करडा) रंगाचे होईल. खोटा चांदीचा अर्क रंग सोडतो. दुसऱ्यापद्धतीने ओळखाचे झाल्यास वर्खाचा नमुना कोमट पाण्यात टाका. त्यात डायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे थेंब टाका. मिश्रणात हायड्रोजनचे बुडबुडे आले तर भेसळ असल्याचे ओळखा. पिठीसाखर / साखर यात खाण्याचा व धुण्याचा सोडा मिश्रित केला असतो. हे ओळखण्यासाठी पिठीसाखरेच्या नमुन्यात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे थेंब टाका. फेस आल्यास भेसळ आहे असे समजावे. साखरेतही खडूच्या भुकटीची भेसळ असते. पेलाभर पाण्यात एक चमचा साखर टाका. साखर थेट तळाला गेली तर शुध्द समजा. काही कण पाण्यात तरंगत राहिले तर भेसळ समजा.ravindra.more@lokmat.com