अहमदनगर : राज्य शासनाने शासकीय रुग्णालय उपचारपद्धतीत अचानक दरवाढ केली आहे़ राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, दरवाढीचा राज्यातील सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे़ ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे़ याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या निवेदनात ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी म्हटले आहे की, राज्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे़ शासनाने रुग्णसेवेत अचानक दरवाढ केली आहे़ शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता उपचारासाठी शासकीय रुग्णालयाचा लाभ घेतात़ रुग्णसेवा व औषधांमध्ये दरवाढ झाल्याने याचा गरीब जनतेला आर्थिक फटका बसणार आहे़ राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शासनाने ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करून पालकमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे़
रुग्णसेवेतील दरवाढ मागे घ्यावी आंदोलनाचा इशारा : संभाजी ब्रिगेडची मागणी
By admin | Updated: January 9, 2016 12:18 IST