उष्माघाताने नशिराबाद येथे तरुणाचा मृत्यू
By admin | Updated: April 19, 2016 23:22 IST
नशिराबाद : सामुदायिक जेवणाचा कार्यक्रम आटोपून सायकलीने घरी परतणार्या जगदीश बाळू पाटील (वय २५ रा.नशिराबाद) या तरुणाचा मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता उष्माघाताने मृत्यू झाला. मुख्य रस्त्यावर ग्रामोद्योग मंडळाजवळ उन्हाच्या तीव्र झळा बसल्याने जगदीशला चक्कर आली, त्यात तो सायकलीच्या खाली कोसळला व काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.
उष्माघाताने नशिराबाद येथे तरुणाचा मृत्यू
नशिराबाद : सामुदायिक जेवणाचा कार्यक्रम आटोपून सायकलीने घरी परतणार्या जगदीश बाळू पाटील (वय २५ रा.नशिराबाद) या तरुणाचा मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता उष्माघाताने मृत्यू झाला. मुख्य रस्त्यावर ग्रामोद्योग मंडळाजवळ उन्हाच्या तीव्र झळा बसल्याने जगदीशला चक्कर आली, त्यात तो सायकलीच्या खाली कोसळला व काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.जगदीश हा शेतातील कुलदेवी सटवाई देवीजवळ जेवणास गेला होता. तेथून परत येत असताना ही घटना घडली. नशिराबादमधील खालची अळी भागात संत सावता माळी मंदिराजवळ राहत होता. वर्षभरापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. कुटुंबातील सर्वचजण मजुरी करतात. जगदीश हा घरातील कर्ता तरुण होता. त्याच्या पात पत्नी, आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.