शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गायीचं तूप देईल तुम्हाला चिरतारुण्य आणि सौंदर्यही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 14:47 IST

गायीच्या तुपातील शक्ती बनवेल तुम्हाला ताकदवान आणि राखेल अनेक आजारांपासून दूर..

ठळक मुद्देगायीच्या तुपात आहे कॅन्सरला रोखण्याची शक्तीचयापचय क्रिया सुधारते.पचनशक्ती वाढते.हृदयासाठीही उपयुक्त

- मयूर पठाडेगायीचं तूप आरोग्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं. आयुर्वेदात तर गायीच्या तुपाला खूपच महत्त्व आहे. अनेक आजारांवर त्याचा उपयोग होतो. मात्र त्याचबरोबर गायीचं तूप वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं असंही काही जणांना वाटतं. त्यामुळे ते आहारातून गायीचं तूप कमी करण्याचा किंवा हद्दपार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र गायीचं तूप आरोग्यासाठी खरंच किती उपयुक्त आहे, याबाबत नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आणि त्यातून गायीच्या तुपाचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं.गायीच्या तुपात जे गुणधर्म आहेत, तेवढे म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या दुधात नाहीत, हेदेखील या संशोधनातून सिद्ध झालं.

काय आहेत गायीच्या तुपाचे उपयोग?१) गायीच्या तुपावर काही जणांचा जो आक्षेप होता, की गायीचं तूप वजन वाढवतं, तो दावा चुकीचा असल्याचं या संशोधनातून सिद्ध झालं, याऊलट गायीचं तूप वजन घटवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.२- गायीच्या तुपामुळे आपल्या शरीरातील कोलेस्टोरॉलची लेव्हल योग्य प्रमाणात राहते. शिवाय चांगल्या कोलेस्टोरॉलचं प्रमाणही वाढतं.३- पचनशक्ती वाढवण्यासाठी गायीचं तूप उत्तम आहे.४- हृदयाच्या व्यवस्थित चलनवलनासाठीही गायीचं तूप महत्त्वाचं असल्याचं लक्षात आलं.५- गायीच्या तुपाचा आणखी एक गुणविशेष म्हणजे त्यामुळे तुमच्या त्वचेला खºया अर्थान ‘निखार’ येतो आणि तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि चमकदार होते.६- चयापचय क्रियेत गायीच्या तुपामुळे सुधारणा घडून येते.७- कॅन्सरपासून लढण्यासाठी गायीच्या तुपापासून आपल्याला शक्ती मिळते.८- अर्धशिशी, डोकेदुखी यासारख्या त्रस्त करणाºया विकारांपासूनही गायीच्या तुपामुळे मुक्ती मिळू शकते.गायीचं तूप असं बहुगुणी आहे. त्याचा योग्य प्रमाणात जर नियमितपणे वापर केला गेला, तर अनेक अजारांपासून मुक्ती तर तुम्हाला मिळेलच, पण तुमचं आरोग्यही कायम उत्तम राहील.