शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

CoronaVirus News : कोरोना हवेतून पसरतो का? जाणून घ्या, या मागील सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 02:09 IST

हवेतून संसर्गाची जागतिक आरोग्य संघटनेने शक्यता वर्तवल्याची बातमी आल्यापासून अनेकांचा गैरसमज झाला आहे की, कोरोना काही किलोमीटर दूर व एका गावातून दुस-या गावापर्यंत उडून संसर्ग करू शकतो.

-डॉ. अमोल अन्नदाते,(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

पूर्वी मानले जायचे की, संसर्गित व्यक्तीतून बाहेर पडणाऱ्या कोरोनाच्या विषाणूचा व्यास हा ५ ते १० मायक्रोमीटर असल्याने तो १ मीटरपेक्षा जास्त जागेत उडत नाही व ३ ते ४ तासांत खाली बसतात. असे होऊ शकते की कोरोनाबाधित व्यक्तीच्या श्वसनातून बाहेर पडणारे काही (५ ते १० टक्के ) संसर्गकण हे ५ मायक्रोमीटरपेक्षा लहान असतील आणि म्हणून ते १ मीटरपेक्षा जास्त अंतरावर उडून लांबवर जातील आणि ८ तासांपर्यंत हवेत तरंगत राहतील. कमी व्यास असलेले संसर्गकण १ मीटरच्या पुढे जाऊन इतरांना संसर्ग करण्याच्या या प्रक्रियेला हवेतून संसर्ग म्हटले आहे.हवेतून संसर्गाची जागतिक आरोग्य संघटनेने शक्यता वर्तवल्याची बातमी आल्यापासून अनेकांचा गैरसमज झाला आहे की, कोरोना काही किलोमीटर दूर व एका गावातून दुसºया गावापर्यंत उडून संसर्ग करू शकतो. पण असे मुळीच नाही. तो हवेतून जात असला तर आधी १ मीटरच्या थोडा पुढे कदाचित ३, ४ किंवा ५ मीटर पुढे जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता जागा किती बंद आहे यावर अवलंबून आहे.हवेतून संसर्गाची शक्यता असली तरी मुख्य संसर्गाचा स्रोत हा आधी सांगितलेला मोठ्या संसर्गकणांचा म्हणजे १ मीटरच्या अंतरावरच आहे. हवेतून प्रसाराची शक्यता ही कमी जागेत व वारे वाहण्यास फार वाव नाही अशा बंद जागेतच जास्त आहे. तसेच हवेतून संसर्गित होणाºया कणांची संसर्गक्षमता ही १ मीटरच्या आत मोठ्या संसर्गकणांपेक्षा कमी असणार आहे. म्हणून एकमेकांपासून एक मीटरपेक्षा जास्त अंतराने उभे राहून सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व अबाधित राहणार आहे. हवेतून संसर्गाच्या अल्पशा शक्यतेचे महत्त्व काय ?हवेतून संसर्गाची शक्यता ही बंद जागेत जास्त लोक जमल्यावरच असल्याने हे टाळावे व कामाच्या ठिकाणी शक्यतो दार, खिडक्या उघडी ठेवावी. लग्नसमारंभ, धार्मिक स्थळ, बार अशा बंद जागेत जास्त गर्दी होते अशी ठिकाण जाणे टाळावे.हवेतून संसर्गाची शक्यता गृहीत धरली तरी सर्वांनी मास्क वापरल्यास बचाव होईलच. सोशल डिस्टन्सिंग पाळणे सुरू ठेवावे. या गोष्टी पाळल्या तर आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या