शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 02:01 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या खेळाडूंनी हे करणे थांबवले की इतर ठिकाणी हे आपोआप थांबेल. कारण बऱ्याचदा छोट्या प्रमाणावर खेळताना असे नक्कल म्हणून केले जाते.

अनेक वर्षांच्या सवयीप्रमाणे अनेक कारणांसाठी थुंकीचा वापर करण्याची आपल्याला सवय लागली आहे. पण कोरोनानंतर आता ही सवय बदलावी लागणार आहे. याचे कारण थुंकीतून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो आणि ज्या गोष्टीसाठी थुंकी वापरली ती कोरोना पसरवण्यासाठी वाहक ठरू शकते. पुढील गोष्टी करताना थुंकीचा वापर थांबवा.- क्रिकेट खेळताना सुरुवातीच्या ओव्हर्स संपल्यावर चेंडू प्रभावीपणे रिवर्स स्विंग व्हावा म्हणून खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी घाम किंवा थुंकीचा वापर करतात. यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो म्हणून आयसीसीने चेंडू चमकवण्यासाठी थुंकी किंवा घामाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. या ऐवजी ओव्हर संपल्यावर अम्पायरसमोर चेंडू चमकवण्यासाठी कृत्रिम पदार्थ उपलब्ध करून देण्याची तयारी आयसीसीने केली आहे. त्यामुळे खेळाडूंनी असा थुंकी व घामाचा वापर चेंडू चमकवण्यासाठी बंद करावे. आंतरराष्ट्रीयच नव्हे तर स्थानिक व गल्लीत मुले खेळत असलेल्या क्रिकेटमध्येही हा नियम पाळला जावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या खेळाडूंनी हे करणे थांबवले की इतर ठिकाणी हे आपोआप थांबेल. कारण बऱ्याचदा छोट्या प्रमाणावर खेळताना असे नक्कल म्हणून केले जाते.- बँकेमध्ये किंवा घरात नोटा मोजताना थुंकीचा वापर करू नका.- पाकिटे, पोस्ट स्टॅम्प, कोर्टातील फी स्टॅम्प चिटकवण्यासाठी थुंकीचा वापर नको. दिल्ली हायकोर्टाने कोर्टात थुंकीचा वापर न करण्या विषयी आदेश काढला आहे.- यासाठी बँकेत, कोर्टात, मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत, वाचनालये उघडल्यावर तिथेही प्रत्येक टेबलसमोर स्पंजचे तुकडे ओले करून ठेवायला हवे. हे स्पंज ओले करण्यासाठी पाण्याऐवजी हँड सॅनिटायजरचा वापर करता येईल.

- अमोल अन्नदाते(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या