शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
6
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
9
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
10
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
11
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
12
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
13
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
14
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
15
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
16
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
17
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
19
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
20
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश

CoronaVirus Live Updates : बापरे! हृदय, फुफ्फुसांनंतर आता कोरोना करतोय डोळ्यांवर अटॅक; 'ही' 3 लक्षणं दिसताच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:57 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये डोळ्यांना संसर्ग झाल्याचं दिसू लागलं आहे. डोळ्यांमध्ये काही विशेष बदल किंवा अस्वस्थता असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 949 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,21,743 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसचा XE व्हेरिएंट शरीराच्या अवयवांवर नवीन मार्गाने परिणाम करत आहे. जुलाब, उलट्या, तापानंतर आता त्याचा फटका डोळ्यांनाही बसला आहे. वेगवेगळ्या लक्षणांसह कोरोनाचे रुग्ण डॉक्टरांसमोर येत आहेत. 

विशेष म्हणजे कोरोनाची लक्षणे ही सामान्य आजारांसारखीच असतात, त्यामुळे त्यांना लगेच ओळखणे सोपं नसतं. हृदय, फुफ्फुसांनंतर आता कोरोना डोळ्यांवर अटॅक करतो आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये डोळ्यांना संसर्ग झाल्याचं दिसू लागलं आहे. डोळ्यांमध्ये काही विशेष बदल किंवा अस्वस्थता असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोरोनाची डोळ्यांवर कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया...

डोळ्यांवर 'असा' होतो परिणाम

डोळ्यांमध्ये वेदना

एंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की डोळा दुखणे हे कोरोनाचे लक्षण असू शकते. याशिवाय डोळ्यांना खाज येणे हे देखील त्याचे लक्षण असू शकते.

डोळे कोरडे होणे

कोरोनामुळे रुग्णाच्या डोळ्यात कोरडेपणाही दिसून येत आहे. डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणं देखील कोरोनाचं लक्षण आहे. डोळे कोरडे होणं ही देखील एक सामान्य समस्या आहे, अशा परिस्थितीत दोन्हीमधील फरक सोपा नाही आणि फक्त कोरोना चाचणीद्वारेच शोधला जाऊ शकतो.

डोळे लालसर होणे

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, डोळे लालसर होणं हे कोरोनाचं लक्षण आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोना व्हायरस आरएनए अश्रूंमध्ये आढळून आला आहे. 

कोरोनाच्या सामान्य लक्षणांव्यतिरिक्त, जर तुम्हाला ही डोळ्यांशी संबंधित लक्षणे दिसली, तर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांचा योग्य सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याeye care tipsडोळ्यांची निगा