शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

CoronaVirus : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी कशी ठरते फायदेशीर, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 11:13 IST

चीनमध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी वेगवेगळ्या थेरेपीजचा वापर करण्यात आला होता. त्यापैकी एक प्लाझ्मा थेरेपी.

कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगभरातून या महामारीला कसं रोखता येईल याचा विचार केला जात आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी वेगवेगळ्या थेरेपीजचा वापर करण्यात आला होता. त्यापैकी एक प्लाझ्मा  थेरेपी. प्लाझ्मा  थेरेपी कशी काम करते. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहे प्लाझ्मा  थेरेपी

प्लाझ्मा थेरेपीचा वापर नेहमी संक्रमित आजारांसाठी होत आला आहे. म्हणून आता कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी या थेरेपीचा वापर केला जात आहे. या थेरेपीचा वापर करून रुग्ण बरा होऊ शकतो. असा दावा करण्यात आला आहे. या थेरेपीमध्ये पूर्णपणे रुग्ण बरा होण्यासाठी ३ ते ७ दिवसांचा कालावधी लागतो. असं म्हणतात की, पहिल्या महायुद्धात १९१८ मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लू पासून लोकांची सुटका करण्यासाठी प्लाझ्मा  थेरेपीचा वापर करण्यात आला होता.

जेव्हा एखादी व्यक्ती  कोरोना व्हायरसचा सामना करून त्यातून पूर्णपणे बरी होते. किंवा व्हायरसचं संक्रमण होण्यापासून वाचते तेव्हा एंटीबॉडीज तयार होतात आणि त्या व्यक्तीची इम्यून सिस्टिम काही वेळासाठी चांगली होते. इम्युनिटी सेल्समधून प्रोटिन्स उत्सर्जित होत असतात. जे प्लाझ्मामध्ये असतात.  ब्लड प्लाझ्मामध्ये असलेल्या एंटीबॉडीजला औषधात रुपांतर करण्याासाठी ब्लड प्लाझ्माला वेगळं केलं जातं. त्यानंतर एंटीबॉडीज वेगळ्या काढल्या जातात. या थेरेपीला प्लाझ्मा डेराईव्ह थेरेपी असं म्हणतात.  यामुळे रुग्णांच्या शरीरात रोगांपासून लढण्याची क्षमता वाढते.  ( हे पण वाचा-Coronavirus : कोरोनाग्रस्त रूग्णाच्या मागे चालल्यानेही धोका, वाचा व्हायरसची मजबूत पकड कुठपर्यंत?)

प्लाझ्मा  थेरेपीला एंटीबॉडी थेरेपी असं सुद्धा म्हटलं जातं. कोरोनाच्या रुग्णांवर या थेरेपीमुळे तात्काळ उपचार केले जातील. कोरोना व्हायरसचं संक्रमण थांबवण्यासाठी ICMR ने केरळमधील आरोग्य तज्ञांना प्लाझ्मा  थेरेपीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. चीनमध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचं संक्रमण थांबवण्यासाठी  डॉक्टरांनी प्लाझ्मा  थेरेपीचा वापर केला होता. या थेरेपीचा वापर चीनच्या शांघाईमध्ये कोरोना रुग्णाला बरं करण्यासाठी केला होता. ( हे पण वाचा-ब्लड शुगर कमी करण्यासाठी घरच्याघरी वापरा 'हे' उपाय, डायबिटीसचा धोका होईल कमी)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य