शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

Corona virus : कोरोनाला मात दिलेल्या रूग्णांच्या शरीरातून तयार केलं जाईल औषध, जपानच्या कंंपनीचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 16:53 IST

जपानच्या एका फार्मा कंपनीने औषध तयार करण्याचा दावा  केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे चीनसह जगभरात माणसं मरायला सुरूवात झाली आहे. कोरोना व्हायरसने आत्तापर्यंत अनेकांचे बळी घेतले. यामुळेच जगातील सर्वच शास्त्रज्ञ कोरोनावर लस आणि औषध कसं शोधता येईल यावर अधिक भर देत आहे. यासंबंधित अनेक रिसर्च समोर आले आहेत. दरम्यान  जपानच्या एका फार्मा कंपनीने औषध तयार करण्याचा दावा  केला आहे.

जपानची कंपनी टाकेडा फार्मा अनेक दिवसांपासून कोरोनाचं औषध तयार करण्याासाठी प्रयत्नरत होती. या कंपनीने कोरोनापाासून रिकव्हर झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा एंटीबॉडीजपासून औषध तयार केलं आहे. या कंपनीच्या रिसर्चकर्त्यांचा असा दावा आहे की  कोरोनाचं संक्रमण झालेल्या  रुग्णांसाठी हे औषध प्रभावशाली ठरणार आहे. 

कोरोनापासून रिकव्हर झालेल्या रुग्णांच्या शरीरातून काढलेले एंटीबॉडीज नवीन कोरोना रुग्णांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्या रोगप्रतिकारकशक्तीत सुधारणा घडवून आणेल.  असं रिसर्च कर्त्यांचे मत आहे. रुग्णांच्या शरीरात असलेली रोगप्रतिकारकशक्ती एंटीबॉडी वाढवतात आणि आयुष्यभर त्याच स्थितीत ठेवत असतात. एंटीबॉडीज या रक्तातील प्लाझ्मामध्ये असतात. 

ब्लड प्लाझ्मामध्ये असलेले एंटीबॉडीजला औषधात रुपांतर करण्याासाठी ब्लड प्लाज्माला वेगळं केलं जातं. त्यानंतर एंटीबॉडीज वेगळ्या काढल्या जातात. या थेरेपीला प्लाझ्मा डेराईव्ह थेरेपी असं म्हणतात. रुग्णांच्या शरीरात रोगांपासून लढण्याची क्षमता वाढवतात. WHO च्या मते व्हायरसपासून बचाव करण्याासाठी हा योग्य उपाय आहे. ज्यामुळे रुग्णांची रोगांशी  लढण्याची क्षमता वाढते. त्यांनी असंही सांगितलं की  हा प्रयोग यशस्वी झाला नाही असं सुद्धा होऊ शकतं. म्हणून सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. ( हे पण वाचा-Coronavirus: ‘वर्क फ्रॉम होम’ ठरतंय कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी; तुम्हालाही जाणवतोय का ‘हा’ त्रास?)

जपानी फार्मा कंपनी टाकेडाने या आधी सुद्धा इंटरवेनस इम्युनोग्लोबिन नावाचे  रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे औषध तयार केले होते.  कोरोनाच्या औषधाच्या बाबतीत हा उपाय सुरक्षित आहे आणि त्यामुळे कोणत्याही व्हायरसचा धोका उद्भवणार नाही असा दावा केला आहे.  ( हे पण वाचा- Coronvirus : लक्षणं न दिसताही होऊ शकतो कोरोना; 'त्या' आकडेवारीनं धोका वाढला) 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या