शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

Coronavirus: कोरोना विषाणूत वेगाने बदल! म्युटेशनच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या, वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 05:31 IST

कोरोनाची दुसरी लाट येण्यास डबल म्युटंट व्हेरिएंट कारणीभूत नाही. या साथीला वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचे कारण सामान्य नागरिकांचा वाढता निष्काळजीपणा आहे

मुंबई : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मात्र, तिच्याशी कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संबंध असल्याचे स्पष्ट होण्याइतक्या मोठ्या प्रमाणात हा प्रकार आढळलेला नाही, असे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. तरीही कोरोना विषाणूत वेगाने होणारा बदल भविष्यात घातक ठरू शकतो, त्यामुळे संसर्गाविषयी अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.

कोरोना विषाणूच्या म्युटेशनविषयी विषाणूतज्ज्ञ डॉ. आदिल शहा यांनी सांगितले की, कोणत्याही विषाणूच्या उत्परिवर्तनाची प्रक्रिया ही अत्यंत सामान्य आणि नैसर्गिक असते. त्यामुळे केवळ वैद्यकीय संशोधन व अभ्यासाचा भाग म्हणून सामान्यांनी याकडे पाहावे. घाबरून जाण्याची गरज नाही. केवळ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांवर भर द्यावा, सहवासितांचा शोध घेण्यावर भर देऊन संसर्गाची साखळी तोडण्याची गरज आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्यास डबल म्युटंट व्हेरिएंट कारणीभूत नाही. या साथीला वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचे कारण सामान्य नागरिकांचा वाढता निष्काळजीपणा आहे. कोरोनाविषयी सामान्यांची बदललेली मनोवृत्ती अत्यंत घातक आहे. कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास कोरोना वाढणार हे लक्षात घ्यायला हवे. मात्र सध्या काही स्तरांवर देशात हर्ड इम्युनिटी येते, कोरोना साथीचा आजार म्हणून राहणार असे गैरसमज पसरविले जात आहेत, परंतु त्याला शास्त्रीय दाखला नाही. त्यामुळे कोरोनाच्या म्युटेशन प्रक्रियेचा ताण न घेता मास्कचा वापर, शारीरिक अंतर आणि स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे, अशी माहिती डॉ. समीर नायर यांनी दिली.

डबल म्युटेंट व्हेरिएंट म्हणजे काय?डबल म्युटेंट व्हेरिएंट म्हणजे एकाच व्यक्तीला कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटची लागण होते. जगातील पहिले असे प्रकरण ब्राझीलमध्ये आढळले होते. ब्राझीलमध्ये दोन रुग्णांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कोरोनाची लागण झाली होती. 

म्युटेशन म्हणजे काय?

  • म्युटेशन ही अशी क्रिया आहे ज्यात संबंधित विषाणू त्याच्याविरोधात केल्या जाणाऱ्या उपायांना दाद न देण्याच्या दृष्टीने स्वतःमध्ये काही जनुकीय बदल घडवून आणत असतो. 
  • म्युटेशन होण्यापूर्वीच्या विषाणूसाठी तयार केलेल्या लसीचा किंवा औषधाचा परिणाम म्युटेशन झालेल्या विषाणूवर होईलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे अशी म्युटेशन्स शोधण्याचे काम सुरू असते. 
  • म्युटेशन्स काही वेळा जास्त धोकादायक असू शकतात, तर काही म्युटेशन्स फारसे धोकादायक नसू शकतात. लस विकसित करून ती देण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. साहजिकच कोरोनाकडूनही स्वतःच्या बचावासाठी म्युटेशन्स सुरू आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या