शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

श्वासावर नियंत्रण ठेवा, ते तुमच्या मनालाही काबूत ठेवील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 17:30 IST

सुखी जिवनाची गुरुकिल्ली दडलीय तुमच्याच मनात..

ठळक मुद्देमनाला काबूत ठेवायचं तर आधी श्वासावर नियंत्रण ठेवायला शिका.श्वासावर नियंत्रण ठेवलं तर आपोआपच तुमचं मनही ताब्यात राहील.सततच्या प्रयत्नांनी मनावर नियंत्रण ठेवणं आणि आयुष्य सुखी करणं शक्य.

- मयूर पठाडेजगात सर्वात, चंचल, चपळ असेल तर ते म्हणजे मन. काही केल्या ते थांबत नाही, हाताशी येत नाही आणि त्याला धरुनही ठेवता येत नाही. एका क्षणात या मनानं गिरक्या तरी किती घ्याव्यात आणि कुठून कुठे जावं?.. त्या कल्पनेलाही अंत नाही.पण मनावर जो ताबा मिळवतो तो संतपदाला पोहोचतो, असं आपल्या धर्मग्रंथांतही नमूद केलेलं आहे. पण मनाला ताब्यात ठेवण्याइतकी कठीण गोष्ट कोणतीच नाही. अनेक आव्हानं, जबाबदाºया अंगावर असताना आणि रोज, प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या स्पर्धांना तोंड द्यावं लागणाºय आजच्य काळात तर मन अधिकच चंचल झालेलं आहे.पण तुम्ही कोणीही असा, मनाला काबूत ठेवण्याची कला तुम्ही आत्मसात केलीच पाहिजे, नाहीतर मनाच्या या भन्नाट वेगात आपण कुठल्या कुठे भरकटत जाऊ, हेदेखील तितकंच खरं. अर्थातच भारतीय अध्यात्मात मनाला काबूत ठेवण्यासंदर्भात बरेच प्रयोग झाले आहेत. आपल्या ऋषिमुनींनी त्यावर अखंड चिंतन केलं आहे आणि ते शास्त्रसंमतही झालं आहे म्हणजे विज्ञानाच्या कसोटीवरही ते खरं उतरलं आहे. अलीकडच्या काळात भारताच्या या अध्यात्माचा परदेशांतही मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू आहे आणि त्यावर प्रयोगही केले जात आहेत. जे आपल्याला आधीच माहीत आहे, ते पुन्हा आपल्यालाच नव्या, रंगरुपांत सादर करुन सांगितलं जात आहे. तसंच आहे हे मनाचं. मनावर ताबा ठेवा, त्यावर कंट्रोल ठेवा, तुमच्या साºया दु:खाचं आणि आनंदाचं मूळही या मनात आहे, म्हणून मनावर लगाम ठेवला, तर तुमचं चित्तही समाधानी राहील आणि तुम्ही सुखी राहाल असा सल्ला पाश्चात्य अभ्यासकांनीही दिला आहे. आॅस्ट्रेलियातील काही अभ्यासकांनी यासंदर्भात नुकताच मोठा अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो, भरकटणाºया मनाला काबूत ठेवायचं तर आधी श्वासावर नियंत्रण ठेवायला शिका. श्वासावर नियंत्रण ठेवलं तर आपोआपच तुमचं मनही ताब्यात राहील. सततच्या या प्रयत्नांनी मनाला तुम्ही थोडं तरी नियंत्रणात आणू शकाल. पण एकदा का ही किमया तुम्हाला साधली की, अनेक ताणांतून तुमची मुक्तता होईल आणि आयुष्य खºया अर्थानं जगायला तुम्ही शिकाल. मनाला लगाम घालण्याचे हे प्रयोग आपल्यालाही करुन पाहायला काय हरकत आहे! त्यातून तोटा काहीच नाही, झालाच तर फायदाच आहे!