शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कोलेस्टोरॉल, किडनी प्रॉब्लेम?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 16:28 IST

तुमच्या शरीरातील जास्त प्रोटिन्स हेदेखील त्याचं कारण असू शकतं..

ठळक मुद्देआहारात गरजेपेक्षा जास्त प्रोटिन्स असतील तर शरीरातील कोलेस्टोरॉलचं प्रमाण हळूहळू वाढायला लागतं.अनेकदा काहीही कारण नसताना वजन हळूहळू वाढायला लागतं. शरीरातील गरजेपेक्षा जास्त प्रोटिन्स हेदेखील त्याचं कारण असू शकतं.काही वेळा प्रोटिन्स जास्त झाल्यामुळे किडनीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.प्रोटिन्समुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी होऊ शकतं.

- मयूर पठाडेतब्येतीकडे लक्ष द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? काय आणि किती काळजी घ्यायची? आणि मुळात आपल्याला ते समजायला तर हवं ना? आता अनेक जण सांगतात, प्रोटिन्स खा, आपल्या आहारात प्रोटिन्सचा समावेश करा.. पण ते किती खायचं? आपण सारंच ते अंदाजानं करतो. कुठे थांबावं ते आपल्याला कळतच नाही..आता प्रोटिन्स खा, पण थांबायचं केव्हा.. प्रोटिन्सचा मारा जास्त होतोय हे आपल्याला कळणार कसं?..-नक्की कळू शकतं आणि त्यावेळी आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं आणि प्रोटिन्सचा हा मारा थांबवायलाही हवा. नेमकी किती प्रोटिन्स आपल्याला आवश्यक आहेत, त्याचं साधारण प्रमाण आहारतज्ञाकडून समजावूनही घ्ययला हवं. कारण प्रत्येक व्यक्तीची प्रोटिन्सची गरज वेगवेगळी असते. खरंतर प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, अत्यावश्यक फॅट्स साºयाच गोष्टींचं आपल्या शरीरात योग्य संतुलन असायला हवं.

प्रोटिन्स जास्त होताहेत हे कसं ओळखायचं?१- तुमच्या आहारात जर गरजेपेक्षा जास्त प्रोटिन्स असतील तर तुमच्या शरीरातील कोलेस्टोरॉलचं प्रमाण हळूहळू वाढायला लागतं.२- आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे काहीही कारण नसताना तुमचं वजन हळूहळू वाढायला लागतं. असं होत असेल तर गरजेपेक्षा जास्त प्रोटिन्स हेदेखील त्याचं कारण असू शकतं.३- काही वेळा प्रोटिन्स जास्त झाल्यामुळे किडनीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.४- प्रोटिन्समुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी होऊ शकतं आणि तुमच्या शरीराला पाण्याची कमतरता जाणवू शकते आणि सातत्यानं तुम्ही डीहायड्रेटेड राहू शकता. त्यामुळे त्याचं कारण वेळीच तपासायला हवं.५- काहीवेळा तुमच्या शरीराचं तापमानही नॉर्मलपेक्षा कमी होतं. शरीरातील प्रोटिन्स वाढल्याचं हे कारण असू शकतं.त्यामुळे फक्त प्रोटिन्सच नव्हे, कार्बोहायड्रेट्स आणि अत्यावश्यक फॅट्सचं आपल्या शरीरातील प्रमाणही वेळोवेळी तपासून पाहा.