शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

महाशिबिराचा पॅटर्न मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा : महाआरोग्य शिबिराचे सहा मंंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

By admin | Updated: January 9, 2016 23:23 IST

मुख्य

मुख्य
जळगाव- दुष्काळ व इतर समस्यांमुळे शेतकरी, गोरगरीब कुटंुंब, मजूर अडचणीत आहेत. अशात कुठला आजार आला तर मोठी समस्या असते. मराठवाड्यातही आरोग्य सेवांची गरज आहे. या स्थितीत शेतकर्‍यांना मदत, आधार म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार्‍यांतर्फे जळगावात आयोजित विनामूल्य महाआरोग्य शिबिरासारखा कार्यक्रम मराठवाड्यातही राबविला जाईल. त्यासाठी आम्ही मदत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शहरात आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दिले.
खान्देश सेंट्रल मॉलच्या आवारात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्य अल्पसंख्याक विकास आयोगाचे अध्यक्ष मोहंमद हुसेन खान, जे.जे.रुग्णालय, मुंबईचे अधिष्ठाता डॉ.तात्याराव लहाने, खान्देशातील ठिकठिकाणचे आमदार, राज्यभरातील नामांकीत डॉक्टर आदी उपस्थित होते.


जलसंपदामंत्र्यांना मानाचा मुजरा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जळगावात गोरगरीब, शेतकरी आदींच्या आरोग्य सेवेसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे २० वर्षे काम करीत आहे. ते आरोग्यदूत आहे. त्यांच्या कामाचे वर्णन करायला शब्द नाहीत. जे काम महाजन यांनी केले त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांना आमचा मानाचा मुजरा...., असे तोंडभरून कौतुक मुख्यमंत्र्यांनी जलसंपदामंत्री महाजन यांचे केले.


आमच्याकडे पॅरलल आरोग्यखाते
आरोग्यमंत्रीपद शिवसेनेकडे असले तरी गिरीश महाजन यांच्या रुपाने आमच्याकडे पॅरलल आरोग्य मंत्रालय आहे. जे डॉक्टर सहा महिने रुग्णांना भेटत नाही... सतत व्यस्त असतात ते या महाआरोग्यशिबिरासाठी आले. गिरीश महाजन व त्यांचा सहकारी रामेश्वर यांच्या पुण्याईमुळे हे शक्य झाले. रामेश्वर हा महाजन यांचा उजवा हात आहे. आमच्या नागपुरातील रुग्ण आले तर मी त्यांच्यासाठी सेवेबाबत रामेश्वर यांना सांगत असतो, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी रामेश्वर नाईक यांच्याबाबत केले. तसेच सामान्यांनी जे अधिकार दिले आहेत त्याचा पुरेपूर वापर महाजन हे सामान्यांसाठी करीत आहेत, असेही मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.