शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

ऋतू बदलतोय? इन्फेक्शन टाळण्यासाठी काय कराल?

By admin | Updated: June 6, 2017 17:38 IST

सर्दी-खोकला,अंगदुखी या ऋतूबदलताना होणाऱ्या कॉमन आजारांना दूर कसं ठेवाल?

- नितांत महाजनऋतूबदल होतोय. दरवर्षी या काळात एक मंद, उदास वातावरण असतं. मळभ येतं. आपल्यालाच एकदम उदास वाटतं. आळस येतो. अनेकांना सांधेदुसखीचा त्रास होतो. काहीजणांना एकदम डिप्रेस्ट वाटून रडू येऊ शकतं. ही सगळी वातावरणाची कृपा आहे असं मानलं तरी, अशी काही लक्षणं असतील तर किंवा दरवर्षी हवा बदलली की आपल्याला हमखास सर्दीखोकला होत असेल तर आपल्या आहाराविहारात काही बदल करायला हवेत. पूर्वीच्या काळी रीतीभातीतून ऋतूप्रमाणे आहारबदल होत असे आता आपण त्यासाऱ्याकडे जुनाट म्हणून लक्ष देत नाही आणि आहारात योग्य बदल न केल्यानं ऋतूबदल त्रास देऊ शकतो.त्यावर उपाय काय?उपाय म्हणून आपण काही गोष्टी करु शकतो. १) व्हिटॅमिन डीआपल्याकडे उदंड सूर्यप्रकाश असूनही अनेक स्त्रीपुरुषांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते. स्त्रियांमध्ये तर जास्तच. त्यावर उपाय काय? खरंतर रोज सकाळी १० मिनिटं तरी किमान कोवळा सूर्यप्रकाश आपल्याला मिळायला हवा. उन्हात जायला हवं. त्यामुळे सूर्योदयानंतर लगेच काही काळ उन्हात फिरुन या, खुर्ची टाकून बसा. त्यानं डी जीवनसत्व तर मिळेलच. फ्रेश वाटेल. हे जीवनसत्व फारच कमी असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्यानं औषध घ्या.

 

२) प्रो बायोटिकफार मोठा वाटतो हा शब्द. त्या साठीची औषधंही बाजारात ढिगानं मिळतात. म्हणजे काय तर आपल्या पोटात पचनाला मदत करणाऱ्या हेल्दी बॅक्टेरियांची आतड्यांना मदत होणं. ते आतड्यात असणं. त्यासाठीची औषधं घेण्यापेक्षा आहारात दह्याताकाचा वापर करावा. शक्यतो दही सकाळच्या जेवणात, नाश्त्यात घ्यावं. त्यानं पचनशक्ती चांगली राहते.३) झिंकझिंक सप्लीमेण्ट प्रतिकार शक्ती वाढवायला मदत करते. घरचा गुळाचा शिरा, साधा शिरा, पौष्टिक सुकामेवा, मनूका यातून हे मिळू शकतं. पण इन्फेक्शन सतत होत असतील तर डॉक्टरच्या सल्यानं झिंक सप्लीमेण्टची औषधं घेवू शकतात.४) आयर्नलोह. रक्तवाढीसाठी आवश्यक. नाचणीचं पिठ, गुळाचा शिरा, बीट, राजगीरा लाडू असं खरंतर या काळात खायला हवं. आणि शक्यतोवर लोखंडी कढईतच भाज्या करायला हव्या. त्यातून लोह पोटात जातं. आपलं हिमोग्लोबिन तपासून घ्यावं. ते फारच कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम.५) नाश्ताहा सगळ्यात सोपा उपाय. या काळात आणि पुढे पावसाळ्यातही भरपेट नाश्ता चुकवायचा नाही. गरमागरम, घरचं, पोळीभाजी, पोहेसांजा, असं खाल्लेलं उत्तम. शक्यतो आंबवलेले पदार्थ टाळावेत. सकाळी पोटभर नाश्ता केला तर त्यानं आपली एनर्जी लेव्हल चांगली राहते, मूडही चांगला राहतो दिवसभर.