शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख

बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख
-विद्यार्थी अडचणीत : यंत्रसामुग्री व शिक्षकांची कमी

नागपूर : राज्यातील मेडिकल महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, परंतु बीएएमएसची प्रक्रिया रोखण्यात आल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहे. भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने केलेल्या पाहणीत अनेक त्रुटी आढळून आल्याने सुमारे ८० टक्के महाविद्यालयांमधील प्र्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आल्याची माहिती आहे. यात नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासह, मुंबई, पुणे आणि नांदेडच्या महाविद्यालयांचा समावेश आहे.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांत दरवर्षी प्रवेश प्रक्रियेपूर्वी भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेद्वारे तपासणी केली जाते. परिषदेच्या मानकाचे पालन न झाल्यास प्रवेश प्रक्रिया थांबविली जाते. राज्यभरात एकूण ६५ आयुर्वेद महाविद्यालये आहेत. यात चार शासकीय १८ अनुदानित तर उर्वरित खासगी महाविद्यालये आहेत. सूत्राच्या माहितीनुसार उस्मानाबाद येथील महाविद्यालयाला परवानगी देण्यात आली आहे, तर तीन शासकीय महाविद्यालयावर रोख लावण्यात आली आहे. सांगण्यात येते की, सुमारे १०-१२ खासगी महाविद्यालयांनाच प्रथम वर्षाच्या प्रवेशाला मंजुरी देण्यात आली. नागपूर आयुर्वेद महाविद्यालयाच्या बीएएमएस प्रथम वर्षाच्या १०० जागा आहेत. सोबतच याच सत्रात पदव्युत्तरच्या २१ जागांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश होणार होते. परंतु या जागांवरील प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत.
-५ ऑक्टोबरपर्यंत दिला वेळ
सूत्राच्या माहितीनुसार त्रुटी दूर करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्यासाठी परिषदेने ५ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची एक चमू या दिवशी दिल्लीतील भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेसमोर त्रुटी दूर करण्यासंदर्भातील उपाययोजनांची माहिती देईल. सांगण्यात येते की, महाविद्यालयांमधील उपकरणांची कमी, लेक्चर आणि काही विषयांचे प्राध्यापक नसल्याने या महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेवर रोख लावण्यात आली आहे. जर रोख हटविण्यात आली तर बीएएमएसच्या १०० आणि स्नातकोत्तरच्या २१ जागांवर प्रवेश दिले जातील.

बॉक्स...
-मुख्यमंत्री पुढाकार घेतील का?
शनिवार ३ ऑक्टोबर रोजी नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे येणार आहेत. महाविद्यालयातील त्रुटींमुळे रोखण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी ही सर्व नेते मंडळी पुढाकार घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.