शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरग्रस्त बहिणीसाठी भावाचे साकडे

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

पुणे: वडिलांचे छत्र हरपलेले, घरची हलाखीची परिस्थिती, डोक्यावर साधे छप्पर नाही, आई कबाड कष्ट करते अशाच परिस्थितीत बहिणीला ११ व्या वर्षी ब्लड कॅन्सर झाल्याने स्वप्नील जाधव या तीच्या भावाने तिला रक्षाबंधनाच्या दिवशी मदतीचा हात दिला आहे. साखळीपर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर या मंडळाच्या गणपतीच्या हातात राखी बांधून बहिणीला बरे ...


पुणे: वडिलांचे छत्र हरपलेले, घरची हलाखीची परिस्थिती, डोक्यावर साधे छप्पर नाही, आई कबाड कष्ट करते अशाच परिस्थितीत बहिणीला ११ व्या वर्षी ब्लड कॅन्सर झाल्याने स्वप्नील जाधव या तीच्या भावाने तिला रक्षाबंधनाच्या दिवशी मदतीचा हात दिला आहे. साखळीपर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर या मंडळाच्या गणपतीच्या हातात राखी बांधून बहिणीला बरे वाटावे यासाठी हा भाऊ गणपती जवळ प्रार्थना केली. मंडळाच्या वतीने स्वप्नीलला त्यांच्या बहिणीच्या इलाजासाठी सहा हजार रोख रक्कम देण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आणि नगरसेवक रविंद्र माळवदकर, भाई कात्रे, सागर नलावडे, अनिल काळे आदी उपस्थितीत होते.
या चिमुकल्या बहिणीसाठी तिचा फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणारा भाऊ आणि तिची आई बरेच प्रयत्न करत आहेत. समाजाकडून मदतीचा हात मिळाल्यास तिच्यावर योग्य ते उपचार होऊन ती लवकर बरी व्हावी अशी जाधव कुटुंबियांची अपेक्षा आहे. अनेक व्यक्ती व संघटना यांनी आपापल्या परिने यासाठी मदतीचे हात पुढे केले आहेत. भावा-बहिणीच्या नात्याचा हा अतूट धागा कायम रहावा यासाठी साक्षीचा भाऊ स्वप्निल आपल्या बहीणीसाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. सध्या तिच्यावर कमांड हॉस्पिटलवर उपचार चालू असून दर महिन्याला तीचा बोनमॅरोचा खर्च करावा लागतो. तसेच औषधोपचारासाठीही मोठा खर्च येत असून तो परवडत नसल्याने उपचार थांबवले होते. परंतु मदत मिळाल्यास हा खर्च करणे शक्य होणार असल्याचे स्वप्निलने लोकमतशी बोलताना सांगितले.

चौकट
साक्षीच्या आजारावरील पुढील उपचार चालू ठेवणे आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रयत्न करणे हीच तीला खरी ओवाळणी आहे.
स्वप्निल जाधव, साक्षीचा भाऊ