शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं सांगणारी ‘स्मार्ट ब्रा!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 16:53 IST

ब्रेस्ट कॅन्सरचं प्राथमिक लक्षणं सांगू शकणारी ब्रा बनवल्याचा १८ वर्षाच्या मुलाचा दावा

- निशा चढ्ढामेक्सिकोत राहणाऱ्या १८ वर्षाच्या मुलानं सेन्सर्स असलेली एक स्मार्ट ब्रा बनवल्याचा दावा केला आहे. ही ब्रा अंगात घातली तर स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचं निदान लवकर होवू शकेल आणि अनेक जीव वाचतील असा दावा या मुलानं केला आहे. ज्युलिअन रिओ चाण्टू असं या मुलाचं नाव आहे. त्याची आई स्तनाच्या कर्करोगाला बळी पडली, स्तनातील गाठ, स्तन काढून टाकल्यावरही कॅन्सरशी तिचा लढा चालूच राहिला. या कॅन्सरचं निदान वेळीच झालं असतं तर आपली आई वाचली असती असं त्याला वाटू लागलं. त्यावर त्यानं संशोधन सुरु केलं आणि ही विशेष ब्रा तयार केली.आजच्या घडीला तरी स्तनाच्या कॅन्सरचं लवकर निदान किवा तो आपल्याला होवू शकतो का हे तपासण्याची फारशी यंत्रणा नाही. हातानं स्वत:च स्वत:ला तपासून ही शक्यता नाही हे बघावं लागतं. मात्र अनेकदा स्तनातला कॅन्सर आहे हे लक्षात येत नाही. त्यावर इलाज म्हणून या मुलानं ही ब्रा तयार केली. ज्यात २०० सेन्सर्स आहेत. ही ब्रा साधारण १ तास ते एक आठवडा परीधान केली असता हे सेन्सर्स स्तनाचा आकार, रंग, तापमान यासाऱ्याची माहिती जमा करतील. ती माहिती स्मार्ट फोन किंवा कम्प्युटरला जोडलेली असेल. त्यातले हीट सेन्सर्स रक्तपुरवठ्याचा, त्यातल्या पेशींचा, पेशींच्या वाढीचाही कल पाहतील, त्याचा डाटा तयार होईल. त्यानंतर आर्टिफिशियल इंटिलिजन्सद्वारे ही माहिती प्रोसेस होवून कॅन्सरची शक्यता आहे की नाही हे सांगितलं जावू शकतं.अर्थात हे संशोधन अजूनही प्राथमिक स्वरुपात असून त्यावर काम सुरु आहे.