शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी जीवनासाठी ब्रेक फास्ट महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 20:08 IST

शरीर निरोगी ठेवायचे असेल तर सकाळी ब्रेकफास्ट करणे आवश्यक आहे.

निरोगी राहण्यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट हा फार महत्त्वाचा आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात अनेकांच्या जीवनशैलीचे वेळापत्रक पार बदलून गेले आहे. यामुळे ब्रेकफास्टही काहींना वेळेवर घेता येत नाही. त्याचे विविध प्रकारचे दुष्परिणामही आहेत. त्याकरिता शरीर निरोगी ठेवायचे असेल तर  सकाळी ब्रेकफास्ट करणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचे आरोग्यावर दुरगामी परिणामी होतात.  त्याचीच माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.  ब्रेकफास्ट का आहे आवश्यक :दररोज सकाळी  ब्रेकफास्ट करणे हे शरीरासाठी उत्तम आहे.  रात्रीच्या झोपेनंतर  पचनशक्तीला ताजेतवाने ठेवण्यासाठी पौष्टिक पदार्थांचा त्यामध्ये समावेश करावा. त्यामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊन, दिवसभर काम करण्यासाठी ऊजार्ही मिळते. तसेच दुपारी जादा भूक लागत नाही व त्यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. मनाची एकाग्रता ठेवण्यासाठीही सकाळचा ब्रेकफास्ट आवश्यक आहे.काय असावे ब्रेकफास्टमध्ये  : दडपे पोहे, दही पोहे, दूध पोहे, मक्याचे पोहे, हिरव्या पालेभाज्यांचे पराठे  खीर, खारीक, बदाम पूड, उकडलेले अंडी, सुकामेवा, शेंगणदाणा, राजगिरा, कणीक, मूग, नाचणी पिठाचा लाडू, थालीपीठ व पुºया, कॉर्नफ्लेक्स, आॅम्लेट पोळी , धिरडे,  फळे, सुकामेवा व मोड आलेली धान्य याचा ब्रेकफास्टमध्ये समावेश असावा.ब्रेकफास्टचे फायदे : सकाळी ब्रेकफास्ट केल्याने तब्येत उत्तम राहते. चिडचिडपणा होत नसून उलट एकाग्रता चांगली राहते. हृदयाचा आजार किंवा मधुमेह असणाºया रुग्णांसाठी तर  ब्रेकफास्ट हा खूप गरजेचा आहे.  शरीराला दिवसभर गतीशील ठेवण्यासाठी व  आळस दूर ठेवण्यासाठी आवश्यक आहे. सकाळी जर ब्रेकफास्ट केला नाहीतर वेळोवेळी खाण्याची इच्छा निर्माण होते. असे वेळोवेळी खाणे हे आरोग्यासाठी चांगले नसून, त्यामुळे विविध समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच त्यांचे वजनही वाढू शकते. ताज्या व पौष्टिक ब्रेकफास्टामुळे दिवसभर उत्साह राहतो. सकाळी घरातून बाहेर पडताना ब्रेकफास्ट करणे हे आवश्यक आहे.  तसेच लहान मुलांचे  अभ्यासात मन चांगले रमते. तसेच ते अधिक तळमळीने दिलेले काम पूर्ण करतात. जी मुले ब्रेकफास्ट करीत नाहीत. ती थकलेली वाटतात व चिडचिड्या स्वभावाची होतात.ब्रेकफास्ट ही एक फॅशन : ब्रेकफास्ट करणे हे आरोग्यासाठी उत्तम आहे. परंतू, अलीकडे फॅशन म्हणून ब्रेकफास्टकडे बघीतले जात आहे. घरी बे्रकफास्ट न करता बाहेर हॉटेलमध्ये जाऊन, ब्रेकफास्ट करणे ही आपल्याकडे फॅशन रुजत चालली आहे. त्यामुळे वीकेंडला तर हॉटेल फुल्ल होतात. cnxoldfiles/strong> : आपल्याकडील स्टार मंडळी ही  कामात कितीही बिझी असली. तरीही सकाळचा ब्रेकफास्ट वेळेवर घेतात. तसेच दररोज त्यामध्ये वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी त्यांच्या फेमस हॉटेल्स या ठरलेल्या आहेत. यावरुनच ब्रेकफास्ट दररोजच्या आहारात किती महत्वाचा आहे, हे लक्षात येते.