रक्तदान शिबीर
By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST
रक्तदान शिबिर
रक्तदान शिबीर
रक्तदान शिबिरनागपूर : लकडगंज येथील विनायकराव देशमुख हायस्कूलमध्ये दिवंगत डॉ. श्रीकांत मटकरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर पार पडले. शिबिरात नि:शुल्क रक्तगट तपासणीही करण्यात आली. यात ४० जणांनी रक्तदान करून ४५० विद्यार्थ्यांनी रक्तगट तपासणी करून घेतली. शिबिराच्या प्रारंभी डॉ. स्वाती मटकरी, दीपक काटोले, डॉ. प्रशांत निचकवडे, डॉ. सजन मित्रा, जयंत दळवी यांनी जीवनज्योत प्रज्वलित केली. कार्यक्रमात डॉ. अजय काटे, डॉ. किशोर टावरी, डॉ. सतीश देशमुख, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. उमेश देशमुख, डॉ. गिरीश जतकर, डॉ. बी. बी. गुप्ता, राजन देशमुख, पद्माकर धानोरकर, डॉ. सतीश जयस्वाल, उमेश शाहू उपस्थित होते. संचालन अनिल आदमने यांनी केले.