शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Black is fashionable : यंदाच्या पावसाळ्यात काळ्या रंगाचं महत्व का वाढतंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2017 17:52 IST

‘मिक्स अ‍ॅण्ड मॅच’च्या नव्या कॉण्ट्रास्ट मॅचिंगचा एक खास रंगमंत्रच!

पवित्रा कस्तुरेकाळा रंग अनेकांना आवडत, अनेकांना खूप आवडतो. त्यात आता पावसाळा. कुंद हवा. डल वातावरण. त्यात कुठं काळे कपडे घालणार? अजून उदासबिदास वाटेल असा एक समज आहेत. पावसाळ्यात ब्राईट, उष्ण रगांचे कपडे घालावेत असं म्हणतात. ते खरंही आहे. पण म्हणून काळा रंग वापरुच नये असं काही आहे का? तर तसंही नाही, कारण यंदा नुकत्याच सुरु झालेल्या पावसाळ्यातही काळ्या रंगाची मिक्स मॅच जादू बहार आणू शकेल. कारण काळा हा आता आॅलटाईम फेवरिट कलर मानला जातो. कॉण्ट्रास्ट मॅचिंगच्या काळात तर काळ्याचं महत्व अधिकच वाढतं आहे. स्ट्रीट फॅशन ते सेलिब्रिटी फॅशन अशा सर्व प्लॅटफॉर्मवर सध्या काळ्या रंगाची चलती आहे. एवढंच कशाला अलिकडे रंगीत छत्र्यांपेक्षाही काळ्या छत्र्या पुन्हा फॅशनेबल होत आहेत, त्यांना एक पर्सनल टच दिला जातो आहे. मुख्य म्हणजे आपण फॅशन ढ आहोत असं वाटत असलं तरी कशाहीबरोबर कधीही ब्लॅक रंग वापरता येतोच. त्यामुळे पावसाळी फॅशन विषयी आपलं घोर अज्ञान असलं तरी यंदा बिन्धास्त काळ्या रंगाचा वापर करा, ते हीट आहेच.

१) काळा रंग कशावरही घालता येतो. म्हणजे ब्लॅक पॅण्ट, लेगिन्स, सलवार असं काहीही घातलं तरी त्याच्यावरचा एक ब्राईट कुर्ता किंवा गळ्यातलं एकदम ट्रेण्डी दिसू शकतं.२) गळ्यात-कानात काय घालायचं, चप्पल कुठल्या रंगाची घालायची, बॅग कुठली घ्यायची? किती विचार करतात अनेकजण. आपण तसं करायचं काहीच कारण नाही. कारण बिन्धास्त काळी बॅग, चप्पल, गळ्यात काळ्या शेडचं काही, आॅक्सडाईज किंवा चांदीचे कानातले वापरले तरी दिसतो आपण फॅशनेबलच.

३) लेअरचा एक ट्रेण्ड आहे. पावसाळ्यात अनेकांना लेअर करणं आवडतं. शर्ट, शर्टवर श्रग, जॅकेट, लॉँग जॅकेट, स्ट्रोल असं काहीबाही लेअर केलं जातं. पण ते करायचं तर रंगसंगती उत्तम जमायला हवी. पर्याय काय, काळ्या रंगाचे एकदोन कपडे घाला, जमून येईल लेअर परफेक्ट.४) डाऊट असेल की फॅशन काय? संध्याकाळी काय घालतात, रात्री काय, फॉर्मल काय? अशावेळी फार विचार न करता काळ्या रंगाचे कपडे घालणं उत्तम.

५) ऋतू बदल झाला की अमूक टेक्शचरचे, अमूक रंगांचे, प्रिण्टचे कपडे बाद होतात असा एक फॅशन ट्रेण्ड आहे. दर ऋतूत कुठून आणायचे पैसे नव्या खरेदीसाठी? त्यापेक्षा काळ्या रंगाचे चार-दोन उत्तम कपडे घेवून ठेवावेत. जॅकेट, जिन्स, श्रग, शर्ट. तेच आलटून पालटून सर्व ऋतूत घालणं योग्य.

६) काळा रंग क्लासी दिसतो. आणि सोफिस्टिकेटेडही. उगीच बटबटीत नाही की लाऊड नाही. त्यामुळे काळ्या रंगाच्या कपड्यांतल्या माणसांची शोभा होत नाही.