शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जिममध्ये तुम्ही बॉडी कमवताय कि गमवताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 16:16 IST

चाचपून बघा स्वत:ला आणि व्हा वेळीच सावध

ठळक मुद्देअति व्यायामामुळे दुखापत झाली तरीही विश्रांती घ्यायला त्यांची तयारी नसते.काही कारणानं ते व्यायाम करू शकले नाहीत, तर अपसेट होतात, त्यांच्या मनावर ताण येतो. काही जणांना तर चक्क डिप्रेशन येतं.असे लोक कस्सून व्यायाम तर करतातच, पण दिवसभर त्यांच्या डोक्यात, मनातही तोच विचार असतो.

- मयूर पठाडेव्यायामाची आवड असणं चांगलंच, पण त्याचं जेव्हा व्यसन होऊ लागतं, तेव्हा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. दुर्दैवानं व्यायामाचं अ‍ॅडिक्शन असणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे आणि तज्ञांनी त्याबाबत चिंताही व्यक्त केली आहे.थोडंसं लक्ष दिलं तर आपल्यालाही कळू शकतं कोणाला व्यायामाच्या वेडानं झपाटलं आहे ते. प्रत्यक्ष त्या व्यायामपटूला मात्र आपण ‘अति’ करतोय हे अनेकदा लक्षातच येत नाही.त्यांनी स्वत: जर आत्मपरिक्षण केलं तर त्यांना ते कळू शकतं, पण ते समजून घेण्याची अनेकांची तयारी नसते.अति व्यायाम करणाºयांची काय आहेत लक्षणं?१- व्यायामाचं अ‍ॅडिक्शन अनेकांमध्ये इतकं वाढतं की आपण समाजाचा एक घटक आहोत, हेच ते विसरतात. अनेक विद्यार्थी, नोकरदार तर कॉलेज किंवा आपल्या कामावर जाण्यापेक्षाही व्यायाम करून घाम गाळण्याला जास्त पसंती देतात.२- अति व्यायामामुळे त्यांच्या शरीराची हानी तर होतेच, पण अनेकदा एवढ्या तीव्र व्यायामासाठी त्यांचं शरीरही सुदृढ राहात नाही, तरीही त्यांना त्याची पर्वा नसते.३- जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करण्याकडे त्यांचा ओढा असतो.४- अति व्यायामामुळे दुखापत झाली तरीही विश्रांती घ्यायला त्यांची तयारी नसते.५- काही कारणानं ते व्यायाम करू शकले नाहीत, तर अपसेट होतात, त्यांच्या मनावर ताण येतो. काही जणांना तर चक्क डिप्रेशन येतं.६- असे लोक कस्सून व्यायाम तर करतातच, पण दिवसभर त्यांच्या डोक्यात, मनातही तोच विचार असतो.बघा, तुम्ही स्वत: असे असाल, किंवा तुमच्या परिचयाचं कोणी असं असेल, तर वेळीच त्यापासून सावध व्हा आणि आपल्या मित्र, मैत्रिणींनाही त्यापासून सावध करा. अशानं बॉडी कमवण्याऐवजी तुम्ही बॉडी गमवाल..