शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही एक्सरसाइज अ‍ॅडिक्ट आहात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 16:14 IST

धावपटू आणि बॉडीबिल्डर्समध्ये वाढतंय व्यायामाचं अ‍ॅडिक्शन..

ठळक मुद्देखरंतर सर्वसामान्य व्यक्तींसाठी दिवसातला अर्धा-पाऊण तासाचा व्यायाम पुरेसा ठरू शकतो... पण काही जण एक्सरसाइज अ‍ॅडिक्ट असतात. कितीही व्यायाम केला, तरी त्यांना तो पुरेसा वाटत नाही.किमान दहा टक्के लोक असे आहेत, ज्यांना व्यायामाचं अ‍ॅडिक्शन आहे. हे अ‍ॅडिक्शन इतकं की, त्याशिवाय ते जगूच शकत नाहीत.ज्यांना व्यायामानं झपाटलेलं असतं, त्यात मुख्यत: दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे धावपटू आणि बॉडीबिल्डर्स.. असं अभ्यासकांचं निरीक्षण आहे.

- मयूर पठाडेसर्वसामान्य सर्वच माणसांसाठी व्यायाम हा अविभाज्य भाग आहे, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा तो अविभाज्य भाग असला पाहिजे इतंक व्यायामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. लहान असो, किंवा मोठा, आपलं आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल, उत्साही, आनंदी दिर्घायुष्य हवं असेल तर व्यायामाशिवाय गत्यंतर नाही. अर्थातच हे साºयांना मान्य आहे, असतं आणि त्यासाठी त्यांचा बºयाचदा प्रामाणिक प्रयत्नही असतो.. पण अनेकांना मुख्य अडचण येते ती वेळेची. आपल्या व्यस्त दिनक्रमात व्यायामासाठी आणखी वेळ कुठून काढायचा यासासाठी..खरंतर सर्वसामान्य व्यक्तींसाठी दिवसातला अर्धा-पाऊण तासाचा व्यायाम पुरेसा ठरू शकतो... पण काही जण असे असतात, त्यांचं अर्ध्या-पाऊण तासानं समाधान होत नाही. ते एक्सरसाइज अ‍ॅडिक्ट असतात. कितीही व्यायाम केला, तरी त्यांना तो पुरेसा वाटत नाही. अर्थातच हे प्रमाण कमी नाही आणि दिवसेंदिवस ते वाढतंच आहे, असं अभ्यासकांचं निरीक्षण आहे. समाजातले किमान दहा टक्के लोक असे आहेत, ज्यांना व्यायामाचं अ‍ॅडिक्शन आहे. हे अ‍ॅडिक्शन इतकं की, त्याशिवाय ते जगूच शकत नाहीत. व्यायामाच्या विचारानं आणि कृतीनं त्यांना घेरलेलं असतं. अर्थात यासंदर्भात अनेकांचं दुमतही आहे. अर्ध्या-पाऊण तासाच्या व्यायामानं तुम्हाला फारसा काहीच फायदा मिळत नाही किमान रोज दोन तास तुम्ही व्यायाम केलात, तर त्याचा तुम्हाला तब्बल चार पट फायदा मिळतो असंही अनेकांचं म्हणणं आहे.अर्थात या वादात जरी गेलं नाही, तरी अति व्यायाम आणि सारखं व्यायामाच्याच विचारात असलेल्यांची संख्या वाढते आहे आणि त्यात पुरुषांबरोबर स्त्रियांचाही समावेश आहे.ज्यांना व्यायामानं झपाटलेलं असतं, त्यात मुख्यत: दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे धावपटू आणि बॉडीबिल्डर्स.. असं अभ्यासकांचं निरीक्षण आहे. त्यांनी अशा एक्सेसिव्ह व्यायामापासून दूर राहिलं पाहिजे आणि आटोक्यातच व्यायाम केला पाहिजे असा तज्ञांचा सल्ला आहे.तुम्हीही या अ‍ॅडिक्शनमध्ये अडकला असाल तर थोडं सावधान..त्यानं तुमच्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी तोटाच होऊ शकतो.अशा लोकांमध्ये काय लक्षणं दिसतात ते पाहूया पुढच्या भागात..