शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पिताना चुकताय?-सांभाळा, पचनाचा आजार होइल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 15:53 IST

पाणी काय आपण नेहमीच पितो, पण पाणी पिण्याची योग्य रीत आपल्याला माहिती आहे का?

ठळक मुद्देपाणी जीवनावश्यक आहेच, पण चुकीच्या रीतीने प्यायल्यामुळे अपाय होऊ शकतो!

पाणी आपण पितोच. ते जीवनावश्यक. पण जेवायला जसं आपल्याला शिकवण्यात आलं तसं पाणी प्यायचं काही कुणी शिकवत नाही. तोंडाला भांडं लावून आपण घटाघटा पाणी पितोच. पण चुकीच्या रीतीनं पाणी प्यायल्यामुळे शरीराला अपाय होवू शकतो असं आता आरोग्य अभ्यासक म्हणत आहेत.साधारण पाणी पिताना काही चुका सर्रास केल्या जातात किंवा होतात. त्या टाळाव्यात असं सांगणारे काही अभ्यास अलिकडेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट. जी आजवर आपल्या घरातली वडीलधारी माणसं सांगत होतीच. ते म्हणजे बाहेरुन आल्यावर, टळटळीत उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये.दुसरं म्हणजे उभं राहून, भांडय़ाला तोंड न लावता वरुन पाणी पिऊ नये.ूउभ्यानं पाणी प्यायल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कायम बसूनच पाणी प्यावे. बसून पाणी प्याल्यानं मृतपिंडाचे कामही सुरळीत चालते असा अभ्यास म्हणतो.सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलिकडचा अत्यंत महत्वाचा प्रश्न. पाणी किती प्यावं. सकाळी उठल्याउठल्या पाणी प्यावं का?तर त्याचं उत्तर म्हणजे तहान लागली तरच पाणी प्यावं. वाटलं म्हणून, प्यायचंच म्हणून पाणी पिऊ नये. पाणी पितानाही ते ही एकदम घटाघटा पाणी न पिता, थोडं थोडं पाणी हळू हळू प्यावं. खूप घटाघटा पाणी प्यायल्यानं मन भरत नाही. तहान भागल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे आपण जास्त पाणी पितो. त्यानं पोटात डब्ब झाल्यासारखं वाटतं. म्हणून सावकाश बसून पाणी पिणं उत्तम.