शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

धुम्रपानापासून दूर? तरीही बैठी जीवनशैली देईल धुम्रपानाचे धोके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 14:44 IST

‘उठा’, नाहीतर यमदूत समोरच उभा आहे!

ठळक मुद्देजितक्या जास्त वेळ एकाजागी बसाल, तेवढा मृत्यूही तुमच्या जवळ येईलबसून राहाण्याची कितीही ‘सक्ती’ तुमच्यावर असली तरीही अर्धा-पाऊण तासापेक्षा जास्त वेळ एकाच जागी चिटकून बसू नका.रोज १३ तासाच्या आसपास बैठं काम करीत असाल किंवा साठ ते नव्वद मिनिटं सलग बसलेला असलात, तर इतरांपेक्षा मृत्यू दुप्पट वेगानं तुम्हाला गाठू शकतो!

- मयूर पठाडेआराम करायला, मस्त बसून राहायला सगळ्यांनाच आवडतं, पण किती? बसणार आणि आराम तरी किती करणार? अर्थातच आजकालच्या फास्ट जमान्यात कुणी राजीखुशीनं एका जागेवर बसत नाही, हेही खरंच. आपल्या जबाबदाºयाच आपल्याला एका जागेवर बसवतात, तिथून आपल्याला उठू देत नाही.. पण त्यामुळे कोणत्या धोक्याला तुम्ही जवळ आणताहेत हे तुम्हाला माहीत आहे?तुम्ही जितक्या जास्त वेळ एकाजागी बसाल, तेवढा मृत्यूही तुमच्या जवळ येईल आणि एकदिवस यमदूत तुम्हाला आपल्या सोबत घेऊन जाईल.. इतरांपेक्षा खूपच लवकर.. असा इशाराच संशोधकांनी दिला आहे.त्यामुळे बसून राहाण्याची कितीही ‘सक्ती’ तुमच्यावर असली तरीही अर्धा-पाऊण तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही एकाच जागी चिटकून बसू नका, असं संशोधकांचं म्हणणं आहे. प्रत्येक तीस-चाळीस मिनिटांनंतर किमान दोन-पाच मिनिटांचा ब्रेक घेतला तर यमदूत तुमच्यापासून दूर राहील असं त्यांचं म्हणणं आहे.संशोधकांनी तर या बैठ्या जीवनशैलीचं थेट गणितच मांडून दाखवलं आहे. सर्व मिळून रोज तुम्ही १३ तासाच्या आसपास बसत असाल, बैठं काम करीत असाल किंवा साठ ते नव्वद मिनिटं सलग तुम्ही बसलेला असलात, तर इतरांपेक्षा मृत्यू दुप्पट वेगानं तुम्हाला गाठू शकतो!या जीवनशैलीमुळे मृत्यूचा धोका किमान दुप्पट वाढतो. याकडे तातडीनं लक्ष द्या आणि जीवनशैली बदला असा संशोधकांनी कळकळीनं सल्ला दिला आहे.कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला असून जगभरात बैठ्या जीवनशैलीचं प्रमाण वाढतं आहे. वेगवेगळ्या जबाबदाºया आणि आधुनिक तंत्रज्ञानही त्याला कारणीभूत आहे असं त्यांचं निरीक्षण आहे.ही बैठी जीवनशैली इतकी घातक आहे, की शास्त्रज्ञांनी त्याला ’आधुनिक जगातलं धुम्रपान’ असंच नाव दिलं आहे.धुम्रपानामुळे जे धोके आपल्याला होतात, तशाच प्रकारचे धोके या बैठ्या जीवनशैलीनं आपल्याला देऊ केले आहेत, त्यामुळे त्यापासून लांब राहिलात, तर जास्त काळ जगाल.. असा शास्त्रज्ञांचा सल्ला आहे. बघा, तुम्हाला तो मानायचा की नाही? मानला तर फायदा नक्कीच आहे..